मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या गणेशभक्त व चाकरमान्यांसाठी राज्य सरकारने टोलमाफीची (Ganeshotsav Toll Exemption) घोषणा केली होती. त्यासाठी पासेसचे वितरणही करण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात ही टोलमाफी केवळ कागदापुरती ठरल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. पास असतानाही ऑनलाईन टोलवसुली सुरू असून गणेशभक्तांकडून थेट रक्कम डेबिट केली जात आहे. या प्रकारामुळे गणेशभक्तांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.