esakal | मुंबईत रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश 
sakal

बोलून बातमी शोधा

remdesivir.jpeg


रेमडेसिवीर कोरोनावर सर्वाधिक प्रभावी ठरणारे इंजेक्शन

मुंबईत रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश 

sakal_logo
By
Team eSakal

मुंबई: मुंबईसह महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या वाढत्या रुग्ण संख्येला नियंत्रित करण्यासाठी शासनाने अनेक निर्बंध घातले आहेत. मुंबईत रुग्ण संख्या वाढत असतानाच, ऑक्सिजन, व्हेटिंलेटर्स, बेडस् बरोबर रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे. रेमडेसिवीर कोरोनावर प्रभावी ठरणारे इंजेक्शन आहे. त्यामुळे या इंजेक्शनचा सध्या काळाबाजार सुरु आहे. हे इंजेक्शन मिळवण्यासाठी अनेक ठिकाणी रांगा लागल्याचे चित्र महाराष्ट्रात पाहायला मिळते.

कालच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी हा काळाबाजार रोखण्यासाठी कठोर पावलं उचलण्याचा इशारा दिला होता. दरम्यान आज खासगीत रेमडेसिवीर इंजेक्शन जास्त पैशांमध्ये  विकणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखा 10 च्या पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.या प्रकरणी काही जणांना पोलिसांनी अटक केली आहे.आरोपींकडून पोलिसांनी डझनभर इंजेक्शनचा साठा जप्त केल्याचे कळते. हे इंजेक्शन आरोपींनी कुठून आणली, कुठे विकणार होते याचा आता गुन्हे शाखेचे पोलिस शोध घेत आहेत.

'वर्क फ्रॉम होम'मुळे लोकलमधील गर्दीत घट

रेमडेसिवीर इंजेक्शनबद्दल काल देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते?
सरकारने रेमडेसिवीर इंजेक्शनकडे विशेष लक्ष दिल पाहिजे. रेमडेसीवीरचा काळाबाजार सुरु आहे. दुसरी लाट काही राज्यांमध्ये आहे. ज्या राज्यात लाट नाही, तिथून रेमडेसिवीर खरेदी करता येईल का? याकडे लक्ष दिलं पाहिजे. रेमडेसिवीरचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांशी संपर्क साधून  पुरवठा कसा होईल, याकडे लक्ष दिलं पाहिजे. कुठल्याही परिस्थिती काळाबाजार होणार नाही याची काळजी घ्या" असे फडणवीसांनी सांगितले होते. 

(संपादन - दीनानाथ परब)
 

loading image
go to top