esakal | 'वर्क फ्रॉम होम'मुळे लोकलमधील गर्दीत घट
sakal

बोलून बातमी शोधा

'वर्क फ्रॉम होम'मुळे लोकलमधील गर्दीत घट

मध्य रेल्वेवर 3 लाख तर पश्चिम रेल्वेवर 2 लाख प्रवाशांची घट

'वर्क फ्रॉम होम'मुळे लोकलमधील गर्दीत घट

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा, कुलदीप घायवट

मुंबई: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने कडक निर्बंध लागू करण्यात आले. यासह कोरोनाशी संबंधित नसलेल्या शासकीय कार्यालयातील विभागाना 50 टक्के उपस्थिती कमी करण्याच्या सुचना दिल्या. तर, खासगी कार्यालयांना पूर्णपणे वर्क फ्रॉम होम करण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्यानुसार वर्क फ्रॉम होम वाढल्याने लोकलमधील प्रवाशांची गर्दी रोडावली असल्याचे दिसून येत आहे. मागील एका महिन्यांच्या आकडेवारीनुसार पश्चिम रेल्वे मार्गावरील 2 लाख, तर मध्य रेल्वे मार्गावरील 3 लाख प्रवासी संख्या कमी झाली आहे.

मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी पुन्हा बंद होणार? मंत्र्यांचे महत्त्वाचे वक्तव्य

कोरोनाची तीव्रता वाढत असल्याने राज्य सरकारने वीकेंड लॉकडाऊन जाहीर केले आहे. यासह कडक निर्बंध लागू केले आहेत. लोकल प्रवासाबाबत कोणतेही निर्बंध लागू करण्यात आले नाही. एक फेब्रुवारीपासून राज्य सरकारकडून सर्वसामान्य प्रवाशांना पहिल्या लोकलपासून ते सकाळी 7, दुपारी 12 ते दुपारी 4 आणि रात्री 9 ते शेवटच्या लोकलपर्यत प्रवास करण्याची मर्यादीत वेळ ठरविण्यात आली. यावेळेत सर्वसामान्य प्रवासी प्रवास करू शकत आहेत. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतर खासगी क्षेत्रातील अनेक कार्यालयातील कर्मचारी वर्क फ्रॉम सुरू केले आहे. तर, काही खासगी कंपन्यांनी कोरोना प्रार्दुभाव वाढू नये, कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासह लोकल प्रवासात पीक अव्हरमध्ये परवानगी नसल्याने मागील वर्षीपासून सुरू असलेला वर्क फ्रॉम सुरू ठेवला होता.

"म्हणून राज्यात कोरोना पुन्हा वाढला"; उद्धव ठाकरेंची कबुली

अनलॉक काळात आठवड्यातील दोन दिवस कर्मचाऱ्यांना बोलविण्यात येत होते. त्यामुळे प्रवाशांची गर्दी रोडावल्याचे दिसून आले. मागील एका महिन्यांपासून लॉकडाऊनच्या धसक्याने परप्रांतीय मजुरांनी गावची वाट धरली आहे. त्यामुळे अनेक आस्थापनात जाणारे परप्रांतीय कमी झाले आहेत. परिणामी, मागील एका महिन्यांत पश्चिम रेल्वे मार्गावरील सुमारे 2 लाख 31 हजार प्रवासी संख्या कमी झाल्याची माहिती पश्चिम रेल्वे प्रशासनाच्यावतीने देण्यात आली.तर, मध्य रेल्वे मार्गावरील प्रवासी संख्या 3 लाखांने कमी झाली आहे.

"मागील वर्षी लॉकडाऊन लागल्यापासून कंपनीकडून वर्क फ्रॉम होम दिले आहे. अनलॉक काळात सर्व सेवा सुरू होत्या. तेव्हा एका दिवसाआड कार्यालयात गेलो होतो. मात्र, त्यानंतर पुन्हा वर्क फ्रॉम होम देण्यात आले आहे"
- नितेश लाड, ऐरोली

पश्चिम रेल्वेवरील दर बुधवारी प्रवाशांची संख्या 

बुधवार, 10 मार्च 2021 - 16, 91, 963
बुधवार, 17 मार्च 2021 - 16, 72, 650
बुधवार, 24 मार्च 2021 - 16, 61, 806
बुधवार, 31 मार्च 2021 - 16, 26, 367
बुधवार, 7 एप्रिल 2021 - 14, 60, 412

-------------------------------------------

मध्य रेल्वेवरील दर बुधवारी प्रवाशांची संख्या

बुधवार, 10 मार्च 2021 - 22 लाख 
बुधवार, 17 मार्च 2021 - 20 लाख 
बुधवार, 24 मार्च 2021 - 19 लाख
बुधवार, 31 मार्च 2021 - 19 लाख 
बुधवार, 7 एप्रिल 2021 - 19 लाख

loading image