Gangwar in Ulhasnagar : उल्हासनगरमध्ये गँगवॉर: दोन गटांत भरदिवसा तुफान राडा; चार जण गंभीर जखमी

Mumbai Crime News : गजबजलेल्या रस्त्यावर ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सुरा-चाकू हातात घेऊन दिवसाढवळ्या रक्तरंजित हल्ले होत असतील, तर पोलिस प्रशासनाचा धाक राहिला आहे का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
"Police investigating the scene of a violent gang war in Ulhasnagar, where four people were seriously injured during a daylight clash."
"Police investigating the scene of a violent gang war in Ulhasnagar, where four people were seriously injured during a daylight clash."Sakal
Updated on

उल्हासनगर : कॅम्प नंबर पाच येथील साईनाथ कॉलनीत रविवारी दुपारी दोन गटांत तुफान राडा झाला. पूर्ववैमनस्यातून झालेल्या या हाणामारीत तलवारी आणि चाकूंचा वापर करत एकमेकांवर थेट जीवघेणे हल्ले केले. यात चार जण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com