esakal | गँगस्टर रवी पुजारीला लवकरच मुंबईत येणार; प्रत्यार्पणाच्या दीड वर्षानंतर मुंबईत येणार
sakal

बोलून बातमी शोधा

गँगस्टर रवी पुजारीला लवकरच मुंबईत येणार; प्रत्यार्पणाच्या दीड वर्षानंतर मुंबईत येणार

गॅंगस्टर रवी पुजारीला अखेर बेंगलोर वरून मुंबईत आणण्यात येणार आहे.  मुंबई पोलीसांच्या मागणीनंतर अखेर  शुक्रवारी बंगलोर मधील स्थानिक न्यायालयाने दहा दिवसांच्या कोठडीची मंजुरी दिली आहे.

गँगस्टर रवी पुजारीला लवकरच मुंबईत येणार; प्रत्यार्पणाच्या दीड वर्षानंतर मुंबईत येणार

sakal_logo
By
अनिश पाटील

मुंबई :  गॅंगस्टर रवी पुजारीला अखेर बेंगलोर वरून मुंबईत आणण्यात येणार आहे.  मुंबई पोलीसांच्या मागणीनंतर अखेर  शुक्रवारी बंगलोर मधील स्थानिक न्यायालयाने दहा दिवसांच्या कोठडीची मंजुरी दिली आहे. दीड वर्षांपूर्वी पुजारीच भारतात प्रत्यार्पण करण्यात आले होते.

हेही वाचा - एन-95 सह सर्वच मास्कचे दर निश्‍चित करण्याची मागणी आरोग्य विभागाने फेटाळली

 खटल्याच्या कारवाईसाठी त्याला मुंबईत आणण्यात येणार आहे.  खंडणी विरोधी पथकाला त्याचा ताबा मिळणार आहे 2015 च्या हत्येप्रकरणी हा ताबा देण्यात येणार आहे.रवी पुजारी याच्या विरोधात मुंबईत 49 गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी 26 गुन्हे "मोक्का' अंतर्गत आहेत. त्यामुळे त्याला लवकरात लवकर ताब्यात घेण्याचे आदेश पोलिस आयुक्तांनी होते. ही संपूर्ण प्रक्रिया कायदेशीर बाबी मध्ये  अडकून पडले.
पुजारी सध्या कर्नाटक पोलिसांच्या ताब्यात आहे. बंगळूरुत 39, मंगलोरमध्ये 36, उडुपीत 11, म्हैसूर-हुबळी-धारवाड-कोलार-शिवमोगा येथे प्रत्येकी एक गुन्हा पुजारीच्या विरोधात दाखल आहे. 

पुजारीच्या विरोधात गुजरातमध्येही सुमारे 75 गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे गुजरातने त्याचा आधी ताबा घेतल्यास मुंबई पोलिसांना आणखी वाट पाहावी लागेल. मुंबईच्या सुरक्षेच्या दृष्टीने गुन्हेगारी विश्‍वातील हालचालींची तातडीने माहिती घेणे आवश्‍यक आहे. त्यासाठी रवी पुजारी याच्या चौकशीतून अनेक महत्त्वाचे खुलासे होई शकतील. 

हेही वाचा - ठाकरे सरकारचा वीजबिलबाबत झटका; ग्राहकांना सवलत नाहीच

रवी पुजारीने बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनाही धमकावले होते. 2017-18 मध्ये अनेकांनी त्याच्याकडून धमकीचे फोन येत असल्याच्या तक्रारी दाखल केल्या. 2009 ते 2013 दरम्यान पुजारीने सलमान खान, अक्षय कुमार, करण जोहर, राकेश रोशन यांना धमकावल्याचे सांगण्यात येते.

Gangster Ravi Pujari to arrive in Mumbai soon

----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

loading image