
-शर्मिला वाळुंज
डोंबिवली : भाजपाचे माजी आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणाला एक नवीन वळण लागले आहे. गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड याला यात क्लीन चिट देण्यात आली आहे. उल्हासनगर कोर्टात पुरवणी चार्जशीट दाखल करण्यात आली आहे. यात फक्त दोन आरोपींचा समावेश आहे. वैभव याच्या विरोधात कोणतेही ठोस पुरावे आढळून आले नसल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.