Birla Opus
sakal
मुंबई - कुठे पारंपरिक आरास, कुठे आकर्षक देखावा, तर कुठे पर्यावरणपूरक सजावटीतून सामाजिक संदेश... गणरायाच्या स्वागतासाठी हाउसिंग सोसायट्यांमध्ये सध्या सजावटीची लगबग सुरू आहे. सजावटीतील कल्पकता आणि कलाकौशल्याला व्यासपीठ मिळवून देण्यासाठी बिर्ला ओपस पेंट्सतर्फे ‘बिर्ला ओपस बाप्पाचा मान’ या राज्यस्तरीय सोसायटी गणेशोत्सव सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.