esakal | अलिबाग समुद्रकिनारी तेल तवंग; मासेमारीवर परिणाम होण्याची भीती
sakal

बोलून बातमी शोधा

Alibaug Beach

अलिबाग समुद्रकिनारी तेल तवंग; मासेमारीवर परिणाम होण्याची भीती

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अलिबाग : तालुक्यातील समुद्रकिनारी (Alibaug beach) मोठ्या प्रमाणात तेलाचा तवंग (oil spreading) पसरला आहे. हा प्रकार वारंवार घडत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे मासेमारी व्यवसाय (Fishing) संकटात सापडण्याची भीती व्यक्त करण्यात येते. मालवाहू जहाजांमधून (Shipping cargo) तेल गळती झाल्याने हा तेल तवंग अलिबाग किनाऱ्यावर असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. अलिबाग, रेवदंडा, थळ, वरसोली आणि रेवस परिसरातील समुद्रकिनारी तवंग येण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. १५ दिवसापूर्वीही असाच प्रकार घडला होता. दीड दिवसाच्या गणेशमूर्तीचे (Ganpati Festival) विसर्जन करण्यासाठी गेलेल्या एका भक्ताचा या तवंगामुळे पाय घसरला होता.

हेही वाचा: पालघर जिल्हा परिषदेच्या 15 जागांसाठी 5 ऑक्टोबरला मतदान

किनारपट्टीवर तेल तवंग पसरत असल्याने जिल्ह्यातील मच्छीमारी व्यवसायही मोठ्या संकटात सापडण्याची भीती आहे. तेलाच्या तवंगाचा वास येत असल्याने किनारपट्टीला येणारी मासळी खोल समुद्रात जातात. त्याचा परिणाम मासेमारीवर होतो, असे मच्छीमार गजेंद्र कोळी यांनी सांगितले. दरम्यान, अलिबाग किनाऱ्यावरील तेल तवंग हा समुद्रातील माल वाहू जहाजांच्या गळतीमुळे किनारी आला असावा, असा अंदाज महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे अधिकारी सी. जी लेपांडे यांनी व्यक्त केला.

loading image
go to top