esakal | पालघर जिल्हा परिषदेच्या 15 जागांसाठी 5 ऑक्टोबरला मतदान
sakal

बोलून बातमी शोधा

elections

पालघर जिल्हा परिषदेच्या 15 जागांसाठी 5 ऑक्टोबरला मतदान

sakal_logo
By
संदीप पंडित

विरार : न्यायालयाच्या निर्णयाने ओबीसींचे आरक्षण (OBC reservation) रद्द झाल्याने पालघर जिल्हापरिषदेमधील (Palghar ZP) 15 उमेदवावरांचे पद गेले ओटे. त्या रिक्त झालेल्या जागांवर 5 ऑक्टोबरला मतदान घेण्याची घोषणा (Elections) निवडणूक आयोगाने (Election commission of India) केल्याने साऱ्याच पक्षाची धावपळ होणार आहे. राज्यातील 6 जिल्हापरिषद आणि पंच्यायत समित्यांच्या (Panchayat samiti) निवडणुका ओबीसी आरक्षणावरून रखडल्या होत्या त्यांचा मार्ग मोकळा झाला असून आता या निवडणुका 5 ऑक्टोबरला घेण्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे, त्याबाबतचा निवडणुकीचा कार्यक्रमही आयोगाने जाहीर केला आहे.

हेही वाचा: प्रमुख रुग्णालयांवरील कोविडचा भार कमी करणार; मुंबईत मलेरिया-डेंग्यूचे रुग्ण वाढ

यामध्ये धुळे , नंदुरबार,अकोला,वसीम,व नागपूर जिल्हा परिषदे सह पालघर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा कर्यक्रम हि जाहीर करण्यात आला आहे. जिल्हा परिषद आणि पंच्यायात समितीची निवडणूक 5 ऑक्टोबरला होणार असून 15 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करायचे आहेत तर 21 सप्टेंबरला छाननी होणार आहे.उमेदवारी अर्ज २७ सप्टेंबरला मागे घेण्याची तारीख आहे. आणि 6 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. गौरी गणपतीच्या विसर्जना नंतर लगेच उमेदवारी अर्ज भरायचे असल्याने सर्वच पक्षासाठी हे मोठे आव्हान ठरणार आहे सद्या पालघर जिल्हा परिषदे मध्ये शिवसेना , बहुजन विकास आघाडी ,राष्ट्रवादी काँग्रेस ,काँग्रेस , कॅम्युनिस्ट आणि अपक्ष अशी आघाडी आहे. तर भाजप हा विरोधी पक्ष आहे.

loading image
go to top