esakal | मानाच्या श्रीफळालाही दरवाढीचा फटका; १० ते २० टक्‍के वाढ
sakal

बोलून बातमी शोधा

coconut

मानाच्या श्रीफळालाही दरवाढीचा फटका; १० ते २० टक्‍के वाढ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वाशी : गणेशोत्सवादरम्यान (Ganpati Festival) श्रीफळाला मागणी वाढत असल्यामुळे एपीएमसी बाजारात (APMC Market) आवक वाढली आहे; सण उत्‍सवात पूजेसाठी श्रीफळाला मान असतो. मागणी वाढल्‍याने दरातही वाढ झाली आहे. इंधन दरवाढीचा (Oil rates impact) फटका नारळाला (Coconuts) बसला असून किमतीत १० ते २० रुपयांची (Cost increases) वाढ झाली आहे.

हेही वाचा: पनवेल परिसरात गणेशमूर्तींची होम डिलिव्हरी; उपक्रमाचे भक्तांकडून स्वागत

नारळाचे सर्वाधिक उत्पादन तमिळनाडूमध्ये होते. त्यामुळे बाजारात ८० टक्के नारळ तमिळनाडूमधून येतात. बाकी इतर २० टक्के नारळ हे कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमधून येतात. केरळमधून येणारे नारळ चवीला गोड मधूर असतात. मात्र त्यांची आवक फेब्रुवारी ते मेदरम्यान होते. तमिळनाडूमधून मात्र वर्षभर नारळाची आवक होते.

एपीएमसीतील घाऊक बाजारात दररोज नारळाच्या १५ ते ४० गाड्या येतात. मात्र, गणेशोत्सवात नारळाची आवक वाढते. सध्या ५० ते ७० गाड्या नारळाच्या दररोज बाजारात दाखल होत आहेत. आकारानुसार नारळाचा दर ठरतात. घाऊक बाजारात लहानात लहान नारळ सध्या ९ रुपयांपासून ते मोठ्यात मोठा नारळ ३० रुपयांपर्यंत उपलब्ध आहे. घाऊक बाजारात नारळाच्या आकारानुसार, गोणीवर नारळाचा दर ठरत असतो. त्यानुसार किरकोळ बाजारात लहानात लहान नारळ २० रुपयांपासून ते ५० रुपयांपर्यंत उपलब्ध आहे.

पाच ते आठ रुपयांची वाढ

गणेशोत्सवात बाप्पाच्या आवडीचा मोदकाचा नैवेद्य घरोघरी बनवला जातो. मोदक बनवण्यासाठी आणि देवाला अर्पण करण्यासाठी नारळाची मागणी वाढते. त्यामुळे नारळ खरेदीसाठी बाजारात गर्दी पाहायला मिळते. नारळाच्या किमतीत नगामागे पाच ते आठ रुपयांनी वाढ झाल्‍याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

नारळाची ८० टक्‍के आवक तामिळनाडूतून

दररोज ५० ते ७० गाड्या एपीएमसीत दाखल

घाऊक दर - ९ ते ३०

किरकोळ दर - २० ते ५०

loading image
go to top