esakal | पनवेल परिसरात गणेशमूर्तींची होम डिलिव्हरी; उपक्रमाचे भक्तांकडून स्वागत
sakal

बोलून बातमी शोधा

Ganpati festival 2021

पनवेल परिसरात गणेशमूर्तींची होम डिलिव्हरी; उपक्रमाचे भक्तांकडून स्वागत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पनवेल : यंदा गणेशोत्सवामध्ये (Ganpati Festival) घरगुती गणरायाची प्रतिष्ठापना करणाऱ्यांना घरपोच (Home Delivery) गणेशमूर्ती (Ganpati Idols) देण्याचा निर्णय श्री साई मोरया कला केंद्राकडून घेण्यात आला आहे. या अनोख्या उपक्रमाचे गणेश भक्तांकडून (Devotees) स्वागत करण्यात आले आहे. कोरोनाची दुसरी लाट (Corona second Wave) ओसरल्यानंतर कोरोनाची तिसरा लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासन सज्ज झाले आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने प्रशासनाकडून गणेशोत्सवांमध्ये गर्दी होऊ नये यासाठी आवाहन करण्यात येत आहे.

हेही वाचा: चोरीसाठी पुण्याहून मुंबईत येणाऱ्या महिलेस अटक

मात्र घरगुती गणरायाची प्रतिष्ठापना करणाऱ्या गणेश भक्तांकडून गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येपासूनच गणेशमूर्ती विक्रेत्यांच्या दुकानांसमोर गर्दी होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दुकानांपुढे गर्दी झाल्यास दुकानदारांवर कारवाई करणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे दुकानांसमोर होणारी गर्दी टाळण्यासाठी तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी मूर्तिकारांकडून यंदा बाप्पांची होम डिलिवरी देण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे श्री साई मोरया कला केंद्राचे मालक विशाल नलावडे, अमित सातपुते, सुहास राऊत यांनी सांगितले. पनवेल परिसरातील बऱ्याच विक्रेत्यांनी आणि कला केंद्रांनी घरपोच गणपती बाप्पांची मूर्ती डिलिव्हरी करण्याचा निर्णय घेतला आहे.

"तिसऱ्या लाटेचा विचार करता खरं तर या निर्णयाचे स्वागतच करायला हवं. आणि यामुळे गर्दी कमी होणार आहे."

- विशाल अशोक गिरमकर , गणेशभक्त

"गणपती आणण्यासाठी कला केंद्रावर खुप गर्दी होते. यामुळे बराच वेळ थांबावे लागते. घरपोच गणपतीची डिलिव्हरी होत असल्याने ही गर्दी टाळता येणार आहे असा उपक्रम सर्वच ठिकाणी राबवायला हवा."

- साईनाथ नंदू टिके, गणेशभक्त

loading image
go to top