esakal | कासा : ग्रामीण भागात गणेशोत्सवानिमित्त पथनाट्यातून जनजागृती
sakal

बोलून बातमी शोधा

Kasa Awareness

कासा : ग्रामीण भागात गणेशोत्सवानिमित्त पथनाट्यातून जनजागृती

sakal_logo
By
महेंद्र पवार

कासा : "अग आया बाया,तुम्ही जागे होया

कधी नको तो भयंकर रोग आलाय

सगळ्यांनी लस ती घ्याया

कोरोनाला दूर पलूउया.

माझ्या लोकांनी जागे व्हा"

असे सांगत लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव (Ganpati Festival) हा जन जागृतीसाठी सुरु केला होता. तोच धागा पकडून डहाणू (Dahanu) तालुक्यातील कासा (kasa) येथील तरुणांनी आपल्या भागातील वाढते मद्यपान (Alcohol) आणि त्यामुळे होणारे दुष्परिणाम तसेच कोरोनावरील (corona) लसीबाबत असलेले येथील लोकांचे गैरसमज दूर करण्यासाठी गणेशोत्सवाचा वापर करून पथ नाटयातून (Street play) जन जागृतीचा (Awareness) प्रयोग यशस्वीपणे राबविला आहे.

हेही वाचा: साकीनाका बलात्कार प्रकरणी पुरावे मिळाले - मुंबई पोलिस

डहाणू तालुक्यात सर्वदूर गणेश गणेशोत्सव कमीअधिक उत्साहात सुरू असून ग्रामीण भागात तर गेल्या दोन वर्षापासून कोरोना प्रादुर्भावामुळे गणेशोत्सव साजरे करणाऱ्यांची संख्या घटली आहे. अनेक गाव खेड्यात तर आर्थिक टंचाईमुळे सार्वजनिक उत्सव मंडळे बंद झाले आहेत. कासा जवळील वेती येथे डहाणू शिवसेना तालुका प्रमुख अशोक भोईर यांनी आपल्या घरी गणेशोत्सव साजरा केला आहे त्यात संपूर्ण आजूबाजूच्या पाड्यातील आदिवासी नागरिकांचा सहभाग असतो.

अडीच दिवसाच्या गणेशोत्सवात रात्रीच्या वेळी आदिवासी समाजात असलेले समज गैरसमज दूर करण्यासाठी आदिवासी गायक सचिन ठेमका आणि त्याचे मित्र याने आदिवासी गीते व पथनाट्याद्वारे मद्यपान व लसीकरण बाबतीत असलेले गैरसमज विषयी जनजागृती केली. यावेळी बोलताना अशोक भोईर म्हणाले की अजुनी करोनाचे संकट संपूर्ण नाहीसे झालेले नाही त्यामुळे मी या वर्षी आदिवासी समाजात अजूनही काही अंधश्रद्धा असून त्यात मद्यपान, लसीकरण या बाबतीत गैरसमज असल्याने ह्या समाजात जनजागृतीची गरज आहे. आदिवासी समाजातील शिक्षित मुलांना एकत्र करीत त्यांच्याकडून आदिवासी बोलीभाषेत मध्यपान व लसीकरण या बाबतीत जनजागृती करण्याचे ठरवले.

सुरुवातीस कोरोना चे नियम सांगून अंतरावर बसून या कार्यक्रमाचे आयोजन केले. दुर्गम भागातील आदिवासी लोकांना मद्यपानाने कसे संसार उध्वस्त झाले याबाबतीत पथनाट्यातून आदिवासी बोलीभाषेतून समजावून दाखवले. करोना लसीकरण बाबतीत असलेले गैरसमज दूर करण्यासाठी आदिवासी गीता द्वारे प्रबोधन केले. डहाणू तालुक्यातील आदिवासी गायक सचिन ठेमका व व त्यांचे शिक्षित मित्र यांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमाद्वारे अनेकांचे प्रबोधन झाले. लोकमान्य टिळकांनी खरंतर अशाच प्रबोधनासाठी हा उत्सव सुरू केला होता.असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

loading image
go to top