esakal | चोरीसाठी पुण्याहून मुंबईत येणाऱ्या महिलेस अटक
sakal

बोलून बातमी शोधा

Robbery crime

चोरीसाठी पुण्याहून मुंबईत येणाऱ्या महिलेस अटक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अंधेरी : चोरी (robbery) करण्यासाठी पुण्याहून मुंबईत (pune-mumbai) येऊन नंतर पुन्हा पुण्यात जाणाऱ्या एका महिलेस (woman arrested) कांदिवली पोलिसांनी (kandivali police) अटक केली आहे. चिकूबाई काळे असे या महिलेचे नाव असून तिच्या अटकेने चोरीच्या इतर काही गुन्ह्यांची (Crime cases) उकल होण्याची शक्यता आहे. अवघ्या तीस सेंकदात चिकूबाई ही हातसफाई करुन पळून जात असल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

हेही वाचा: देशातील ६८ रेल्वे स्थानकांचा विकास करण्याचे केंद्राचे नियोजन- रावसाहेब दानवे

याप्रकरणी तक्रारदार वयोवृद्ध महिला कांदिवली परिसरात राहते. काही दिवसांपूर्वी त्या एकट्याच घरी होत्या. घर उघडे असल्याने आरोपी त्यांच्या घरी घुसली आणि काही सेंकदात तिने घरातील सोन्याचे दागिने आणि कॅश असा सव्वालाख रुपयांचा मुद्देमाल घेऊन तेथून पलायन केले होते. हा संपूर्ण प्रकार एका सीसीटिव्ही फुटेजमध्ये कैद झाला होता. या फुटेजवरुन पोलिसांनी या महिलेचा शोध सुरु केला होता. तांत्रिक माहितीवरुन ती महिला पुण्यातील रहिवासी असल्याचे उघडकीस आले. त्यांनतर या पथकाने पुन्हा चोरीसाठी पुण्यातून मुंबईत आलेल्या चिकूबाईला शिताफीने अटक केली. चौकशीत ती पुण्यातून फक्त चोरी करण्यासाठी मुंबईत येत होती. चोरीनंतर ती पुन्हा पुण्यात जात होती. काही दिवस शांत राहिल्यानंतर ती पुन्हा मुंबईत येत असल्याचे समोर आले आहे.

loading image
go to top