esakal | गुजरातमध्ये गरब्याला परवानगी नाही, मग राज्यात कशाला? सुनिल तटकरेंचा भाजपला टोला
sakal

बोलून बातमी शोधा

गुजरातमध्ये गरब्याला परवानगी नाही, मग राज्यात कशाला? सुनिल तटकरेंचा भाजपला टोला

खासदार सुनिल तटकरे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. गुजरातमध्ये गरबा खेळायची परवानगी नाही आहे. मग महाराष्ट्रात गरबा खेळण्याची मागणी कशाला करता असा सवाल तटकरे यांनी भाजपला विचारला आहे.

गुजरातमध्ये गरब्याला परवानगी नाही, मग राज्यात कशाला? सुनिल तटकरेंचा भाजपला टोला

sakal_logo
By
पूजा विचारे

मुंबईः  खासदार सुनिल तटकरे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. गुजरातमध्ये गरबा खेळायची परवानगी नाही आहे. मग महाराष्ट्रात गरबा खेळण्याची मागणी कशाला करता असा सवाल तटकरे यांनी भाजपला विचारला आहे. तसंच सध्या राज्य कोरोना सारख्या संकटाचा सामना करत असताना राज्यपाल मुख्यमंत्र्यांच्या विरोधात भूमिका घेत असून कोणता खेळ खेळत आहेत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.  म्हसाळा येथे आयोजित केलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात तटकरे यांनी हे वक्तव्य केले आहे. 

कोरोना सारख्या महामारीचे संकट असतानाही महाविकास आघाडीचे सरकार राज्यातल्या जनतेच्या हिताचे निर्णय घेताहेत. याचे पोटशूळ विरोधी बाकांवर बसलेल्यांना येताहेत. नेहमीच राज्य सरकारला डिवचण्याचे काम विरोधकांकडून सुरु असल्याचंही तटकरे म्हणालेत. 

अधिक वाचाः  कोणाचाही राजीनामा मिळालेला नाही, चंद्रकांत पाटील यांचे स्पष्टीकरण

मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन असे सांगणारे आणि पवार साहेबांचा पक्ष राहणार नसल्याचं भाकित करणारे आता कुठे आहेत, असं म्हणत राज्यातील जनता आता पाहत आहे. महाविकास आघाडीची मोट बांधत पवार साहेबांनी साऱ्या देशाला थक्क करत राज्यातल्या जनतेला एक प्रकारचा सुखद धक्का दिल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. 

अधिक वाचाः  अतिरिक्त गर्दीत घट होणार, CSMT रेल्वे स्थानकावर क्युआरकोड तपासणीचे गेट

या कार्यक्रमाला खासदार सुनिल तटकरे, पालकमंत्री आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, राष्ट्रवादीचे रायगड जिल्हा अध्यक्ष सुरेशभाऊ लाड, जिल्हा युवक अध्यक्ष अंकीत साखरे,  प्रदेश सरचिटणीस अलिशेठ कौचाली, राजिप उपाध्यक्ष सुधाकर घारे, जिप सभापती गीता जाधव, कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती बबन मनवे, जिल्हा परिषद सदस्या धनश्री पाटील, जिल्हा महिला अध्यक्षा गीता पालरेचा आदी मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होत्या.

Garba is not allowed in Gujarat so why in maharashtra Sunil Tatkare on BJP