esakal | ठाण्यात दोन दिवसांपासून कचराकोंडी
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

ठाण्यात दोन दिवसांपासून कचराकोंडी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

ठाणे : ऐन नवरात्रोत्सवात शहरातील नौपाडा व उथळसर प्रभाग समितीच्या हद्दीत घंटागाड्यांतून कचरा उचलणे बंद केल्याने सर्वत्र कचऱ्याचे ढिगारे निर्माण झाले आहेत. ठेकेदार व पालिका प्रशासनाच्या वादामुळे या घंटागाड्या बंद असून सोसायट्यांमध्ये व रस्त्यावर कचरा साचला आहे.

त्यामुळे ठाणेकरांना नाहक कचरा कोंडीला सामोरे जावे लागत आहे. पालिकेच्या नौपाडा व उथळसर प्रभाग समितीतील इमारतीमधील कचरा उचलण्याचे काम घंटागाडी कंत्राटदाराला देण्यात आले आहे; मात्र घंटागाडीच्या ठेकेदाराची मुदत संपली असतानाही त्याकडे दुर्लक्ष करीत नवा करार करण्यात आला नाही. त्यामुळे दोन दिवसांपासून घंटागाड्या बंदच असून परिसरातील शेकडो इमारतीमध्ये कचऱ्याचे डवे भरून राहिले आहेत.

दरम्यान, या प्रकाराची गंभीर दखल न घेतल्यास महापालिका मुख्यालयात कचरा टाकण्यात येईल, असा इशारा भाजप नगरसेवक नारायण पवार यांनी दिला आहे.

loading image
go to top