Gargai Dam: गारगाई प्रकल्‍प मंजुरीच्या मार्गावर, पण खर्चात मोठी वाढ, ३ हजार कोटींचा प्रकल्प ५,३९६ कोटींवर

Gargai Dam Project Cost Hike: गेल्या १५ वर्षांपासून चर्चेत असणाऱ्या गारगाई धरण प्रकल्पाच्या खर्चात १७१ कोटींनी वाढ झाली आहे. ३ हजार कोटींचा हा प्रकल्प आता ५,३९६ कोटींवर पोहोचला आहे.
Gargai Dam Project Cost Hike

Gargai Dam Project Cost Hike

ESakal

Updated on

मुंबई : गेल्या १५ वर्षांपासून गारगाई धरण प्रकल्पाची चर्चा सुरू असून, या प्रकल्पाची अंदाजित किंमत ३,००६ कोटी होती. मात्र आता या प्रकल्पाचा खर्च ३,२७६ कोटी इतका दर्शवण्यात आला आहे. त्यामुळे गारगाई धरण प्रकल्पाच्या खर्चात १७१ कोटींनी वाढ झाली आहे, तर विविध करांसह या प्रकल्पाची किंमत ५,३९६ कोटींवर गेली आहे. बुधवारी (ता. ११) होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकल्पासाठी केंद्र व राज्य सरकारच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com