esakal | भिवंडीत गॅस सिलिंडर गळतीमुळे भडका; प्रसंगवधानामुळे जीवित हानी टळली
sakal

बोलून बातमी शोधा

भिवंडीत गॅस सिलिंडर गळतीमुळे भडका; प्रसंगवधानामुळे जीवित हानी टळली

भिवंडी तालुक्यातील वळ ग्रामपंचायत हद्दीत रस्त्यालगत असलेल्या एका दुकानाचा गाळ्यातील हॉटेलमध्ये आज सकाळी नऊ वाजता स्वयंपाक गॅस  सिलिंडर बदलत असताना अचानक पेट घेतल्याने संपूर्ण हॉटेलला आग लागली.

भिवंडीत गॅस सिलिंडर गळतीमुळे भडका; प्रसंगवधानामुळे जीवित हानी टळली

sakal_logo
By
शरद भसाळे

भिवंडी :  तालुक्यातील वळ ग्रामपंचायत हद्दीत रस्त्यालगत असलेल्या एका दुकानाचा गाळ्यातील हॉटेलमध्ये आज सकाळी नऊ वाजता स्वयंपाक गॅस  सिलिंडर बदलत असताना अचानक पेट घेतल्याने संपूर्ण हॉटेलला आग लागली. यामध्ये मोठी वित्तहानी झाली.  अग्निशामक दलाचा जवानांनी घटनास्थळी  धाव घेऊन  तीन तासात आग आटोक्यात आणली.  

पावसाळी आजारांबाबतची आकडेवारी आली समोर, वाचा काय म्हणतेय ही आकडेवारी

वळ परिसरात असलेल्या ज्योती हॉटेल  मध्ये  हॉटेल चालक सिलिंडर बदलत असताना त्याला गळती लागल्याने  अचानक पेट घेतला. त्यामुळे घाबरून तो दुकाना बाहेर गेला. त्याने आरडाओरडा केल्याने काही व्यक्तींनी या घटनेची माहिती पोलीस आणि भिवंडी महापालिकेचा अग्निशामक दलास  कळविली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू केले. मात्र आगीने रौद्र रूप धारण केल्याने या भीषण आगीत हॉटेल व त्यामधील लाकडी पोट माळा व फर्निचर असे  साहित्य जाळाले.  कोणतीही जीवीत हानी झाली नाही. स्थानिक नागरीकांनी प्रसंगावधान राखीत गॅस सिलिंडर बाहेर काढला.

आदित्य ठाकरेंनी केलं ट्विट, कलम १४४ लागू झाल्यानंतर म्हणालेत घाबरू नका

 भिवंडी अग्निशामक दलाचा जवानांंनी तीन तास पाण्याचा मारा करीत ही आग शांत करून विझववली नारपोली पोलिसांनी या आगी संदर्भात नोंद घेतली आहे.

----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

loading image
go to top