
मुंबई - :गॅस गळतीच्या चर्चांना पुर्ण विराम देण्यासाठी महानगर पालिका शहरातील काही ठिकाणी वेदर बलून लावणार आहे.येत्या महिन्याभरात हे फुगे खरेदी करण्याची प्रक्रिया पुर्ण होणार आहे. ऑक्टोबर महिन्यात उपनगरातील अनेक भागात गॅसचा उग्र वासू येऊ लागला.अग्निशमन दल,महानगर गॅस लिमीटेडच्या कर्मचाऱ्यांनी रात्र जागवून गॅस गळतीचा उमग शोधण्याचा प्रयत्न केला.मात्र,गळती सापडू शकली नाही. त्यापुर्वी दोन वेळा असाच प्रकार घडला होता. खासकरुन चेंबूर, घाटकोपर, विक्रोळी, पवई, भांडूप, चांदिवली, अंधेरी भागातून अशा तक्रारी आल्या आहेत.या गुढ गॅस गळतीमुळे नागरीकांमध्ये प्रचंड दहशत आहे.
यावर उपाय म्हणून महानगर पालिकेने वेदर बलूनचा वापर करण्याचा निर्णय घेतला."याबाबत प्रक्रिया सुरु झाली असून लवकरच निवीदाही जाहीर करण्यात येणार आहे.महिन्याभरात ही प्रक्रिया पुर्ण होईल असे अतिरीक्त आयुक्त सुरेश ककानी यांनी सांगितले. या बलून मधील यंत्राच्या सहाय्याने ज्या ठिकाणी गॅस गळतीच्या तक्रारी असतील तेथील हवा जमा करुन त्या हेवेचे रासायनिक विश्लेषण करण्यात येईल.त्यानंतर उग्र वास कशा मुळे येतोय हे स्पष्ट होईल.तसेच तो नक्की कोठून येतोय हेही स्पष्ट होईल. गॅस बरोबरच मलवाहीन्या तसेच कचऱ्यांचे कंपोस्ट झाल्यानंतरही उग्र वास येऊ शकतो.त्यामुळे आता नागरीकांना घाबरवणारा वास नक्की कसला आहे हे स्पष्ट होईल.मुंबईतील मलवाहीन्यांमधूनही अनेक वेळा वायूचे उर्त्सजन होऊन उग्र वास येतो.असेही सांगण्यात येईल.
हे फुगे कायमस्वरुपी बसवण्यात येणार नाही.तर,जेव्हा वायू गळतीच्या तक्रारी येतील तेव्हा त्यांचा वापर करता येईल.ज्या ठिकाणहून तक्रारी येतील तेथील हवा फुग्यात जमा करुन त्याचा अभ्यास करण्यात येईल.त्यामुळे या बलूनचा अडथळाही होणार नाही.
gas leaks in Mumbai weather balloons will be installed at various places in the city
----------------------------------------------------------------
( संपादन - तुषार सोनवणे )
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.