Mumbai : डोंबिवली एमआयडीसीत गॅसवाहक पाईपलाईन फुटली

रस्त्याचे खोदकाम सुरू असताना ही घटना घडली
Gas pipeline burst in Dombivli MIDC Gas supply off mumbai
Gas pipeline burst in Dombivli MIDC Gas supply off mumbaisakal

डोंबिवली - डोंबिवली एमआयडीसी निवासी विभागात बुधवारी दुपारी अचानक घरगुती गॅसचा पुरवठा करणारी गॅसची पाईपलाईन फुटली. रस्त्याचे खोदकाम सुरू असताना ही घटना घडली. गॅस पाईपलाईन फुटल्याची बाब एका जागरूक नागरिकाच्या लक्षात आली. त्यांनी तात्काळ याची माहिती महानगर गॅस कंपनीला दिली असता गॅस पुरवठा बंद करण्यात आला. यामुळे कोणतीही दुर्घटना घडली नाही.

एमआयडीसीच्या निवासी विभागात रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. रस्त्याचे खोदकाम करताना ठेकेदार जातीने लक्ष देत नसल्याने कामगारांकडून कामाच्या ठिकाणी पाणी वितरण करणाऱ्या पाईपलाईन, स्ट्रीट लाईटसाठी जोडलेल्या इलेक्ट्रिकल केबल तूटण्याच्या घटना वारंवार घडत आहेत.

त्यात बुधवारी दुपारी साडेचारच्या सुमारास रस्त्यांची कामे सुरू असताना खोदकामावेळी प्लॉट नं. आरएच 36 या एकदंत सोसायटीसमोर महानगर गॅस कंपनीची पाईपलाईन निष्काळजीपणे तुटली. त्यामुळे पाईपमधून निघालेला गॅस बाहेर पडून सर्वत्र वास पसरला. ही बाब संजय चव्हाण व सचिन माने या जागरूक नागरिकांच्या लक्षात आली. त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर महानगर गॅस कंपनीला याची माहिती देताच कर्मचाऱ्यांनी पाईपलाईन चा गॅस पुरवठा बंद केला. यामुळे कोणतीही दुर्घटना घडली नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com