

citizens panic over Gas cylinder supply new rules
ESakal
नवी मुंबई : पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेली गॅसटंचाई आणि केंद्र सरकारने लागू केलेले नवीन निर्बंध यामुळे नवी मुंबईतील सानपाडा आणि तुर्भे परिसरात नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. गॅस वितरण कंपन्यांनी घरगुती सिलिंडरच्या वाटपावर नवीन मर्यादा आणल्याची माहिती मिळताच, सानपाडा येथील एजन्सीबाहेर शेकडो नागरिकांनी रिकामे सिलिंडर घेऊन लांबच लांब रांगा लावल्या होत्या.