Mumbai News: बेस्ट बस थांब्याचे स्थलांतर टॅक्सी-रिक्षा चालकांच्या फायद्याचा, बेस्ट समितीच्या निर्णयाला विरोध; आंदोलनाचा इशारा

BEST Bus Stop Relocation: गेटवे ऑफ इंडिया परिसरातील बेस्ट बस थांब्याचे स्थलांतर करण्याचा प्रस्ताव बेस्ट समितीने मांडला आहे. मात्र या निर्णयाला समिती सदस्यांनी विरोध केला आहे.
BEST Bus Stop Relocation

BEST Bus Stop Relocation

ESakal

Updated on

मुंबई : गेटवे ऑफ इंडिया येथील पर्यटकांच्या सेवेत असलेला बेस्ट बसचा थांबा स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव आजच्या बेस्ट समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी मांडण्यात आला; मात्र समिती सदस्यांनी शेअर टॅक्सी रिक्षा यांच्या फायद्यासाठी हा बस थांबा स्थलांतरित करण्यास विरोध करत आक्रमक भूमिका घेतली. यामुळे समिती अध्यक्षांनी प्रस्ताव प्रशासनाकडे परत पाठवला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com