
मुंबई: नवी मुंबईत उभारण्यात येत असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन जूनमध्ये होईल, अशी घोषणा अदाणी समूहाचे अध्यक्ष गौतम अदाणी यांनी आज केली. आधी या विमानतळाचे उद्घाटन १७ एप्रिलला होणार होते. अदाणी एअरपोर्ट होल्डिंग लि.चे सीईओ अरुण बन्सल यांनी एप्रिलची तारीख जाहीर केली होती; मात्र आता त्यात बदल झाला आहे.