esakal | चेंबूरच्या मेस्त्रीवाडीत पर्यावरणपूरक आकाशकंदिलाचा पिढीजात व्यवसाय
sakal

बोलून बातमी शोधा

akashkandil

बांबूच्या काठ्या, पतंगाचे पेपर, सोनेरी-चंदेरी क्रेप पेपर, दोरा आणि कात्री असे साहित्य वापरून हे पर्यावरणपूरक कंदील चेंबूरमध्ये तयार केले जात आहेत. 

चेंबूरच्या मेस्त्रीवाडीत पर्यावरणपूरक आकाशकंदिलाचा पिढीजात व्यवसाय

sakal_logo
By
नीलेश मोरे

घाटकोपर : दिवाळी म्हटले की घराच्या उंबरठ्यात पणती, दारासमोर रांगोळी, रंगीबेरंगी फटाक्‍यांची आतषबाजी आणि घराच्या प्रवेशद्वारासमोर लख्ख प्रकाश पाडणारा आकाशकंदील. हेच आकाशकंदील तयार करण्याची परंपरा चेंबूरमधील एका कुटुंबाने गेल्या 50 वर्षांपासून टिकवून ठेवली आहे आणि दिवाळीला ते अशा पर्यावरणपूरक 400 ते 500 कंदिलांची विक्री करतात. 

महत्वाची बातमी : अकरावीचे प्रवेशबाबत लवकरच निर्णय; मंत्री वर्षा गायकवाड यांची महत्वपूर्ण माहिती

चेंबूरच्या मेस्त्रीवाडीत नवाले कुटुंबीय तीन पिढ्या आकाशकंदील तयार करत आहेत. 50 वर्षांपासून या कुटुंबाने ही कला टिकवून ठेवली आहे. सध्याच्या वाढत्या शहरीकरणात पारंपरिक आणि पर्यावरणपूरक कंदिलाची जागा चायना कंदिलांनी घेतली आहे. एकदाच खरेदी आणि वर्षानुवर्षे त्याचा पुनर्वापर यामुळे पर्यावरणपूरक कंदिलाच्या मागणी घटत झाली आहे; मात्र तरीही मेस्त्रीवाडीतील नवाले कुटुंब गेल्या 50 वर्षांपासून पर्यावरणपूरक कंदील बनवत आहे. बांबूच्या काठ्या, पतंगाचे पेपर, सोनेरी-चंदेरी क्रेप पेपर, दोरा आणि कात्री असे साहित्य वापरून हे पर्यावरणपूरक कंदील चेंबूरमध्ये तयार केले जात आहेत. 

हे ही वाचा : कोरोनाबाधितांना होऊ शकतो फटाक्यांच्या धुराचा त्रास, ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेणे गरजेचे

मेस्त्रीवाडीत नवाले परिवारासह येथील काही तरुण मंडळीही कंदील बनवण्यासाठी हातभार लावत आहेत. अरविंद नवाले म्हणाले, की आम्ही दिवाळी सणाच्या दोन आठवडे आधी आकाशकंदील तयार करायला घेतो. गेल्या 40 वर्षांहून अधिक वर्षे आम्ही पर्यावरणपूरक कंदील तयार करत आहोत. पंधरा दिवसांत आम्ही 400 ते 500 कंदील बनवतो. या कंदिलाला परदेशातदेखील मागणी आहे. ऑस्ट्रेलियालादेखील आमचे आकाशकंदील गेल्याचे अरविंद नवाले यांनी सांगितले. दिवाळी आणि ख्रिसमस या वेळी आम्ही आकाशकंदील तयार करतो. या आकाशकंदिलाची किंमत 250 रुपयांपासून पुढे 500 रुपयांपर्यंत आहे, असेही त्यांनी सांगितले. 

(संपादन : वैभव गाटे)

Generational business of eco friendly sky lanterns at Mestriwadi Chembur

loading image