कचराकुंड्यांतील कचरा रस्त्यावर; घणसोलीमध्ये स्वच्छता अभियानाचा फज्जा  

शुभांगी पाटील
Thursday, 29 October 2020

स्वच्छता अभियानात देशभरात नवाजलेल्या नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात स्वच्छतेचा फज्जा उडाला आहे. सध्याच्या घडीला वेळेवर कचरा उचलत जात नसल्याने दुपारपर्यंत कचराकुंड्या पूर्ण भरून कचरा रस्त्यावर येत आहे. त्यामुळे घणसोलीकरांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.

तुर्भे ः स्वच्छता अभियानात देशभरात नवाजलेल्या नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात स्वच्छतेचा फज्जा उडाला आहे. सध्याच्या घडीला वेळेवर कचरा उचलत जात नसल्याने दुपारपर्यंत कचराकुंड्या पूर्ण भरून कचरा रस्त्यावर येत आहे. त्यामुळे घणसोलीकरांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. जर परिस्थिती अशीच राहिली, तर नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण होईल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. 

ठाणे जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट, दिवसभरात ८५३ नव्या रुग्णांची भर

ज्या वेळी स्वच्छता अभियानाचा परीक्षण चालू असते, त्या वेळी रात्रीपासून जमा झालेला कचरा दुसऱ्या दिवशी सकाळी आठ ते नऊच्या सुमारास उचलला जात होता. तसेच कचराकुंड्यांलगत असणारी जागा स्वच्छ करून निर्जंतुकीकरण केली जात होते; परंतु आजच्या घडीला घणसोलीमधील अनेक ठिकाणी सध्या दुपार होऊन जाते; पण कचरा उचलला जात नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दुपारपर्यंत कचराकुंड्या पूर्ण भरून जात असल्याने व कचरा रस्त्यावर पडत असल्याने श्वान त्यावर आपला ताबा निर्माण करत आहे. यामुळे कचरा पसरत आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे. 

कोट.. 
कचरा वेळेवर उचलला जात नसेल, तर संबंधित ठेकेदाराला वेळेवर कचरा उचलण्याचे आदेश लगेच देण्यात येईल. 
- बाबासाहेब राजळे, उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन, नवी मुंबई महापालिका 
 

Ghansoli Garbage on the road swachh bharat mission 

(संपादन ः रोशन मोरे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ghansoli Garbage on the road swachh bharat mission