प्राणघातक होर्डिंग नीट दिसण्यासाठी 8 झाडांना दिलं होतं विष, FIR देखील नोंदवला गेला, पण... BMC चा धक्कादायक खुलासा!

Ghatkopar Hoarding Collapse : होर्डिंगच्या आजूबाजूला लावलेली देशी झाडे गूढपणे नष्ट झाली. छेडा नगर जंक्शनजवळ 8 झाडांना विषबाधा करण्यात आल्याचे आयुक्त भूषण गगराणी यांनी सांगितले.
Ghatkopar Hoarding Collapse
Ghatkopar Hoarding Collapseesakal

Ghatkopar Hoarding Collapse :

मुंबईतील घाटकोपर परिसरात वादळामुळे पेट्रोल पंपाच्या बाजुला लावलेले 100 फूट लांब होर्डिंग कोसळले. या अपघातात होर्डिंगखाली  मोठ्या प्रमाणात लोक गाडले गेले. या कालावधीत मृतांची संख्या 16 वर पोहोचली आहे. अनेकजण जखमी आहेत. 60 तासानंतर बचावकार्य पूर्ण झालं असून सबंधितांवर कारवाई करण्यात येत आहे. या कालावधीत आतापर्यंत 86 जणांना वाचवण्यात यश आले आहे.

होर्डिंगसाठी 8 झाडांना विष -


दरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे. होर्डिंगसाठी 8 झाडांना विष दिल्याचे बीएमसीच्या अहवालात समोर आले आहे. प्रत्यक्षात या झाडांमुळे होर्डिंग दिसत नव्हते, त्यामुळे छेडा नगर जंक्शनजवळील 8 झाडांच्या मुळांमध्ये रसायन टाकण्यात आले. बीएमसीने 19 मे 2023 रोजी या प्रकरणी एफआयआरही दाखल केला होता.

ईस्टर्न एक्स्प्रेस वेवर झाडे पडण्याच्या दोन वेगवेगळ्या घटना घडल्या आहेत. पहिली घटना गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात घडली होती. अशीच एक घटना यावर्षी एप्रिल महिन्यात उघडकीस आली होती. या झाडांच्या मुळांमध्ये छिद्र पाडून विष टाकल्याचे तपासात समोर आले आहे. सुकलेली झाडे तोडता यावीत म्हणून हा प्रयोग केल्याचे समोर आले.

Ghatkopar Hoarding Collapse
Medicine Rate: केंद्र सरकारचा मोठा निर्णय! 41 औषधांच्या किमती होणार कमी, सर्वसामान्यांना मोठा दिलासा

एप्रिलमध्येच नोंदवण्यात आला होता  एफआयआर -


पोलिस तपासात असे दिसून आले की डिसेंबर 2023 मध्ये महापालिकेच्या वृक्ष संरक्षण विभागाने नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल इगो मीडिया या होर्डिंगची देखभाल आणि व्यवस्थापन करणाऱ्या एजन्सीविरुद्ध पोलिस तक्रार दाखल केली होती. बीएमसीच्या अधिकाऱ्यांनी दोन आठवड्यांपूर्वी एप्रिलमध्ये पोलिसांशी संपर्क साधला होता. याप्रकरणी पोलिसांनी तक्रारही नोंदवली होती. पोलिसांकडे आलेल्या तक्रारीत बेकायदा होर्डिंगजवळील झाडे अचानक सुकून मृत्यूमुखी पडल्याचे म्हटले आहे. यामागे कोणाचे तरी षडयंत्र असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला होता.


होर्डिंग लावण्यास परवानगी नव्हती-


मिळालेल्या माहितीनुसार, त्या ठिकाणी चार  होर्डिंग असून त्या सर्व होर्डिंगला एसीपींनी पोलिस आयुक्तालयासाठी मान्यता दिली होती. त्याचवेळी ज्या होर्डिंग पडून एवढी मोठी दुर्घटना घडली ते बेकायदेशीर होते. बीएमसीने माहिती दिली की होर्डिंग्ज लावण्यापूर्वी एजन्सी/रेल्वे यांनी बीएमसीकडून कोणतीही परवानगी/एनओसी घेतलेली नाही.

बीएमसी वर्षभरापासून होर्डिंग लावण्यावर आक्षेप घेत होती. बीएमसी आयुक्त भूषण गगराणी म्हणाले की, नागरी संस्था होर्डिंग तात्काळ काढण्यासाठी नोटीस जारी करेल आणि जमीन मालकी प्राधिकरण आणि होर्डिंगच्या मालकाच्या विरोधात फौजदारी तक्रार देखील दाखल केली जाईल.

Ghatkopar Hoarding Collapse
Manoj Jarange : मनोज जरांगे यांची बीडमधील ८ जून रोजीची सभा रद्द; काय आहे कारण?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com