

Three baby dies in womb
ESakal
मुंबई : घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात बुधवारी (ता. २६) झालेल्या तीन अर्भकांच्या मृत्यू प्रकरणाची वैद्यकीय पार्श्वभूमी रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केली आहे. त्या दिवशी झालेल्या १३ प्रसूतींपैकी दोन प्रकरणांत गर्भवती महिलांना रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच गर्भमृत्यू झाल्याचे निदान झाले होते, तर तिसऱ्या प्रकरणात जन्मानंतर नवजात बाळाची प्रकृती गंभीर झाल्याने अतिदक्षता विभागात उपचार करूनही त्याचा मृत्यू झाला, असे स्पष्टीकरण प्रशासनाने शनिवारी (ता. २९) दिले.