भांडाभांडी झाली पण पराग शाह जिंकले | Election Results 2019

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 24 October 2019

घाटकोपर पूर्व मतदारसंघातून भाजपचे करोडपती उमेदवार पराग शाह यांचा 73054 मतांनी  विजय

घाटकोपर पूर्व मतदारसंघातून भाजपचे करोडपती उमेदवार पराग शाह यांचा 73054 मतांनी  विजय झालाय. प्रकाश मेहता यांना उमेदवारी नाकारल्यानंतर इथल्या भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली होती. अशातच आता मतदार राजाने पराग शाह यांनाच निवडून दिलंय.   

मुंबईतील घाटकोपर मध्ये तिरंगी लढत झाली. या मतदार संघात भाजपचे पराग शाह विरुद्ध मनीषा सूर्यवंशी विरुद्ध मनसेचे सतीश पवार यांच्यात तिरंगी लढत होती. यात मुंबईतील श्रीमंत उमदेवार आणि उद्योगपती राजकारणी पराग शाह यांना भाजप कडून तिकीट दिलं गेलं. पराग शाह यांना तिकीट गेल्याने भाजपचे पराग शाह आणि प्रकाश मेहता वाद चव्हाट्यावर आला होता. दरम्यान गाड्यांची तोडफोड आणि संतप्त कार्यकर्ते आपण सर्वांनी पहिले.

पराग शाह हे सर्वात श्रीमंत नगरसेवक :

पराग शाह हे मुंबईतील सर्वात श्रीमंत उमेदवार आहेत. त्यांच्याकडे साधारण 500 कोटींची संपत्ती आहे.

घाटकोपरमध्ये मनसे IMPACT नाही :

मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अनेक जाहीर साभ घेतल्या, सतीश पवार यांच्यासाठी  राज ठाकरे यांनी घाटकोपरमध्ये देखील जाहीर सभा झाली. मनसेने विरोधीपक्ष बाकावर बसण्याची इच्छा मतदारांसमोर व्यक्त केली होती. अशातच आता घाटकोपरमधील मतदार राजाने पराग शाह यांना विजयी केलंय.  

WebTitle : ghatkopat east vidhansabha constetuency parag shah won the seat


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ghatkopat east vidhansabha constetuency parag shah won the seat