Thane : घोडबंदरवासीयांना मुबलक पाणी मिळणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

water

घोडबंदरवासीयांना मुबलक पाणी मिळणार

ठाणे : नवीन ठाणे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घोडबंदर परिसरातील रहिवाशांची आता पाणी समस्या सुटणार आहे. प्रतिदिन १२ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्याची क्षमता असलेले दोन जलकुंभ कासारवडवली येथे उभारण्यात आले असून, बुधवारी त्याचे लोकार्पण झाले. त्यामुळे घोडबंदरवासीयांना अतिरिक्त पाणी मिळणार आहे.

ठाणे महापालिका कार्यक्षेत्रातील पाणीपुरवठ्याचे अंतर्गत रिमॉडेलिंगचे काम सुरू आहे. पालिकेच्या स्वतंत्र पाणीपुरवठ्यातून वाढीव पाणी उपलब्ध व्हावे यासाठी विविध उपाययोजनांची कामे मंजूर करून त्यांची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. त्याअंतर्गत घोडबंदर रोड परिसरात नव्याने दोन जलकुंभ व पंप देखील उभारण्यात यावेत, यासाठी नगरसेवक नरेश मणेरा यांनी पालिकेकडे पाठपुरावा केला होता.

त्याला अखेर यश आले आहे. पालिकेच्या माध्यमातून कासारवडवली येथे उभारण्यात आलेल्या संप-पंप हाऊस व जलकुंभाचा लोकार्पण सोहळा महापौर नरेश म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली खासदार राजन विचारे यांच्या उपस्थितीत आज पार पडला. यावेळी उपमहापौर पल्लवी कदम, सभापती संजय भोईर, भूषण भोईर, नगरसेवक साधना जोशी, नरेश मणेरा, सिद्धार्थ ओवळेकर, दिलीप ओवळेकर, रवी घरत, मुकेश ठोंबरे, नितीन लांडगे उपस्थित होते.

८० हजार रहिवाशांची तहान भागणार

कासारवडवली येथील दोन्ही जलकुंभांमुळे घोडबंदर रोड परिसरातील पाणी समस्या सुटण्यास मदत होणार आहे. यामध्ये हावरे सिटी, रौनक हाईट, रोझा गार्डनिया, पारिजात गार्डन, महावीर कल्पवृक्ष, पाचवड पाडा, पुराणिक टोक्यो बे, वेदांत हॉस्पिटल, विहंग व्हॅली, उन्नती ग्रीन आदी विभागांतील ८० हजार नागरिकांची तहान भागणार आहे.

loading image
go to top