दरवर्षी गिरगाव चौपाटीवर बाप्पाचं विसर्जन करतात? आधी विसर्जनाचा टाइमस्लॉट बुक करा, नाहीतर ऐनवेळी गोंधळ...

सुमित बागुल
Thursday, 30 July 2020

गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपलाय. मात्र कोरणामुळे यंदाचा गणेश उत्सव साधेपणाने साजरा करावा असं राज्य सरकारकडून सांगण्यात आलंय.

मुंबई : यंदा कोरोनामुळे सर्व सणांवर गदा आलीये. गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपलाय. मात्र कोरणामुळे यंदाचा गणेश उत्सव साधेपणाने साजरा करावा असं राज्य सरकारकडून सांगण्यात आलंय. तशाप्रकारची अधिकृत नियमावली देखील जारी करण्यात आलीये. ज्याप्रकारे सार्वजनिक गणेश उत्सवावर काही निर्बंध घालण्यात आले आहेत. त्याचप्रकारे घरगुती गणपती बाप्पांच्या आगमन अंडी विसर्जनासाठी नियमावली जारी करण्यात आली आहे. गणेशोत्सवामुळे गर्दी होऊन कोरोनाचा फैलाव होऊ नये हाच यामागचा उद्देश आहे.

गणपती बाप्पांच्या आगमन आणि विसर्जनावेळी होणारी गर्दी कमी करण्यासाठी मुंबई महापालिकेकडून आगमन आणि विसर्जनासाठी केवळ पाच जणांनाच परवानगी दिलीये. यंदा आगमन आणि विसर्जन मिरवणूक स्वरूपातही करता येणार नाहीये. 

मोठी बातमी - हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीतून आली 'ही' आनंदाची बातमी

विशेषतः विविध नैसर्गीक आणि कृत्रिम तलाव, घाट आणि चौपाट्यांवर विसर्जनावेळी होणारी अमाप गर्दी लक्षात घेता बृहन्मुंबई महापालिकेकडून विविध उपाययोजना राबवल्या जातायत. याचाच एक भाग म्हणून आता गिरगाव चौपाटीवर विसर्जन करण्यासाठी आधी विशेष बुकिंग करावं लागणार आहे. गिरगाव चौपाटीवर गणपती विसर्जनाच्यावेळी मोठी गर्दी होते. अनेकांनी एकाचवेळी गिरगाव चौपाटीवर येऊ नये आणि कोरोनाचा संभाव्य संसर्ग टाळण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या डी वॉर्डातून ही पद्धत यंदा अवलंबली जाणार आहे असं बोललं जातंय. अद्याप याबद्दल कोणतंही अधिकृत परिपत्रक काढण्यात आलेलं नाही.    

मोठी बातमी -  सर्वात श्रीमंत महापालिकेत तयार होतोय कॉस्ट कटिंगचा आराखडा, BMC अर्थसंकल्प 12 हजार कोटींनी घटणार? 

मुंबईतील विविध भागांतून त्याचबरोबर विशेषतः मलबार हिल, ताडदेव या भागातून मोठ्या प्रमाणात गणेश मूर्ती गिरगाव चौपाटीवर विसर्जनासाठी येत असतात. त्यामुळे गिरगाव चौपाटीवर प्रचंड गर्दी होते. त्यामुळे गर्दी कमी कारण्यासाटःई सोसायटीच्या गेटवरुन महापालिकेनं नेमलेल्या कर्मचाऱ्यांकडून गणेश मूर्ती विसर्जनाला पाठवा, असंही आवाहन महापालिकेकडून करण्यात येतंय. यामुळे सोसायट्यांमधील नागरिकांना सोसायटीबाहेत न पडता गणपती विसर्जन करता येऊ शकतं.

girgaon chupati ganesh immersion d ward may allow immersion only by prior booking of time slot

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: girgaon chupati ganesh immersion d ward may allow immersion only by prior booking of time slot