हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीतून आली 'ही' आनंदाची बातमी

पूजा विचारे
Thursday, 30 July 2020

धारावीतून एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. बुधवारी धारावीत केवळ कोरोनाचे २ रुग्ण आढळून आलेत.

मुंबईः कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असला तरी धारावीतून एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. बुधवारी धारावीत केवळ कोरोनाचे २ रुग्ण आढळून आलेत. मुंबईत कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेला धारावी हा भाग कोरोनामुक्तीच्या दिशेनं वाटचाल करत आहे. सध्या धारावीत ८३ अॅक्टिव्ह रुग्ण उपचार घेताहेत. 

मात्र धारावीच्या बाजूला असलेल्या माहिम आणि दादरमध्ये रुग्णांची संख्या कमी होण्याचं नाव घेत नाही आहे.  बुधवारी माहिम परिसरात २५ नवीन रुग्णांची नोंद झालीय. तर दादरमध्येही २५ नवीन रुग्ण सापडलेत. 

अधिक वाचाः  सर्वात श्रीमंत महापालिकेत तयार होतोय कॉस्ट कटिंगचा आराखडा, BMC अर्थसंकल्प 12 हजार कोटींनी घटणार?

तीन महिन्यांपूर्वी धारावी हा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला होता. मात्र, महापालिका आणि स्थानिक नागरिकांच्या प्रयत्नांमुळं धारावीला कोरोनामुक्त करण्यास यश आलं आहे. धारावीच्या या पॅटर्नचं कौतुक केंद्र सरकारनंही केलं आहे. तसंच WHO नं देखील धारावीच्या यशाचं कौतुक केलं.

हेही वाचाः  जबरदस्त! मुंबईत अवघ्या 'इतक्या' हजार रुग्णांवर उपचार सुरु

मुंबईत बुधवारी दिवसभरात १,११८ नवीन रुग्ण आढळलेत. तर बुधवारी ६० जणांचा मृत्यू झाला आहे. २८ जुलैला ५५ मृत व्यक्तींची नोंद झाली. तर २७ जुलैला ३९ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती पालिकेनं दिली आहे.

दहिसरमध्ये गेल्या १५ दिवसात एकही रुग्ण नाही

दहिसरमधील गणपत पाटील नगरमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. या भागात दररोज मोठ्या प्रमाणात नवीन प्रकरणं आढळून यायची. मात्र आता हा भाग कोरोनामुक्तीच्या दिशेनं वाटचाल करत आहे. या भागात संपूर्ण एक महिन्याचं कडक लॉकडाऊन पाळण्यात आलं आणि आता या भागातील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. गेल्या 15 दिवसांत झोपडपट्टी भागातून कोणत्याही प्रकारची नवीन प्रकरणं समोर आली नाहीत. म्हणूनच प्रशासनानं मुख्य न्यू लिंक रोड सुरु केला आहे. दरम्यान झोपडपट्टी भागात अजूनही कडक निर्बंध आहेत. तिथल्या रहिवाशांना कंटेन्मेंट झोनच्या नियमांचं काटेकोरपणे पालन करावे लागेल, जेणेकरुन परिस्थिती नियंत्रणात राहिल.

Only 2 corona virus patients were found in Dharavi on Wednesday


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Only 2 corona virus patients were found in Dharavi on Wednesday