आरशातून तो एकटक तिच्याकडे पाहत होता, एक चुकीचा टर्न घेताच तिनं मारली उडी...

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 15 February 2020

मुंबई - भावाच्या घरून ती स्वतःच्या घरी जायला निघाली. रिक्षातून घरी जाण्याचा तिने निर्णय घेतला. रिक्षा पकडली आणि ती घरी जायला निघाली देखील. मात्र, तिच्यासमोर कोणता प्रसंग येणार होता याबाबत तिला यत्किंचितही शंका नसेल.  रिक्षा चालक वारंवार तिला त्यांच्यासमोरील आरशातून पाहत होता. तिच्या ते लक्षातही आलं होतं. एकाएकी या रिक्षाचालकाने आपली रिक्षा चुकीच्यादिशेने वळवली आणि या घाबरलेल्या तरुणीने धावत्या रिक्षातून उडी मारली. हा भीषण आणि धक्कादायक प्रकार घडलाय मुंबईच्या मुलुंड भागात.

मोठी बातमी - नव्या आदेशांमुळे वोडाफोन-आयडिया लवकरच बंद होणार ?

गुरुवारी रात्री २० वर्षीय अंकिता (नाव बदललेलं आहे) मुलुंड कॉलनी परिसरात राहणाऱ्या आपल्या भावाकडे आली होती. रात्री घरी परतण्यासाठी तिने रिक्षेने जाण्याचा निर्णय घेतला. या तरुणीने रिक्षावाल्याला मुलुंडच्या पंचरत्न भागात रिक्षा नेण्यास सांगितलं. मात्र, या रिक्षाचालकाने रिक्षा भलत्याच ठिकाणी वाळवल्याचा आरोप या मुलीकडूनन करण्यात येतोय.

रिक्षाचालक आरशातून तिच्याकडे वारंवार पाहत अश्लील चाळे देखील करत होता, असं देखील तिने म्हटलंय. एकाएकी या रिक्षावाल्याने रिक्षा चुकीच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केला. मात्र सर्व प्रकार तात्काळ लक्षात आल्याने या मुलीने चालत्या रिक्षातून उडी मारत पुढील बाका प्रसंग टाळला.    

मोठी बातमी -   आजपासून तुमचा EMI होणार कमी, वाचा बातमी

स्पीडब्रेकरसाठी रिक्षावाल्याने रिक्षाचा स्पीड कमी केल्याचं या घाबरलेल्या तरुणीला लक्षात आलं आणि प्रसंगावधान दाखवत तिने पटकन धावत्या रिक्षेतून उडी मारली. दरम्यान रिक्षामधून उडी मारल्याने तिच्या डोक्याला दुखापत झाली आहे. स्थानिकांच्या मदतीने तिला मुलुंडमधील अग्रवाल रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं. 

या तरुणीने मुलुंड पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात रिक्षाचालकाविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या तरुणीची तक्रार नोंदवून घेत आता अज्ञात रिक्षाचालकांचा शोध सुरु केलाय आहे. 

Girl Jumps From Auto Rickshaw after she spotted driver consistently staring at her

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Girl Jumps From Auto Rickshaw after she spotted driver consistently staring at her