

Nashik Girls Shine in NDA Selection; Maharashtra CM Commends Success
esakal
मुंबई: भारतीय सशस्त्र दलात उच्च पदस्थ अधिकारी होण्याची संधी देणाऱ्या राष्ट्रीय संरक्षण अकादमी (एनडीए) मध्ये नाशिक येथील शासनाच्या सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षण केंद्रातून दोन मुलींची निवड झाली आहे. यात देशपातळीवरील गुणवत्ता यादीत जिया करपे हिने दुसरा तर कु. समृद्धी इंगळे हिने १५ वा क्रमांक पटकावला आहे. या दोघींचा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीदरम्यानच मंत्रालयात सत्कार करत त्यांना शुभेच्छा दिल्या.