कर्जफेडीसाठी आणखी चार महिन्यांची मुदत द्या! शिवसेनेच्या 'या' संघटनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

कर्जफेडीसाठी आणखी चार महिन्यांची मुदत द्या! शिवसेनेच्या 'या' संघटनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी


मुंबई ः कोरोना महामारीने देशभरातील सर्वच उद्योगक्षेत्रांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.  या पार्श्वभूमीवर काही अंशी दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने कर्ज फेडीसाठी अतिरिक्त चार महिन्यांची म्हणजेच डिसेंबरअखेरपर्यंत मुदतवाढ देण्यासाठी केंद्र सरकारकडे शिफारस करावी, अशी मागणी शिवसेनाप्रणीत शिव वाहतूक सेनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे केली आहे. 

यापूर्वी केंद्र सरकारने मार्च ते ऑगस्ट या सहा महिन्यांसाठीची कर्जफेड मुदतवाढ जाहीर केली होती. मात्र, अद्याप कोरोनावरील खात्रीशीर लस बाजारात उपलब्ध झाली नसल्याने तसेच परिस्थिती नियंत्रणात नसल्याने बहुतांश उद्योगधंदे अजूनही ठप्पच आहेत. सरकारी कार्यालये, खासगी आस्थापने, तारांकित हाॅटेल्स अत्यंत कमी प्रमाणात सुरू झाल्याने, ऑटोरिक्षा , टॅक्सी, खासगी टुरिस्ट वाहने आणि बससेवाही ठप्प आहे. त्यामुळे अऩेक आस्थापनांना कामगार कमी करण्याची नामुष्की ओढावली असून काही व्यवसाय हे कायमस्वरूपी बंद होण्याच्या मार्गावर आहेत, असे सनेने म्हटले आहे.

नुकतेच आरबीआयने आपल्या पतधोरण आढावा बैठकीनंतर यापुढील काळात कर्जफेडीसाठी कोणतीही मुदतवाढ देणार नसून संबंधित कर्जाची पुनर्रचना करण्यासंबंधी निर्देश देण्यात येतील, असे स्पष्ट केले आहे. परंतु, मुळातच गेले सहा महीने उत्पन्नाचे स्त्रोत पूर्णत: बंद झाल्याने हे कर्जहफ्ते तरी भरायचे कसे ? असा गंभीर प्रश्न वाहतूकदार उद्योग-व्यवसायिकांपुढे उभा आहे. त्यामुळे कर्चफेडीसाठी आणखी चार महिन्यांची मुदत द्यावी, अशी मागणी सेनेने केली आहे. 

कोरोनामुळे आर्थिक संकटाची कुर्‍हाड कोसळलेल्या वाहतूकदारांना परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत काही प्रमाणात दिलासा मिळावा आणि वाहतूक उद्योगक्षेत्राचे या कठीण काळातही अस्तित्व टिकून राहणे आवश्यक आहे. त्यासाठी पुढील चार महीने म्हणजेच वर्षअखेर डिसेंबर महिन्यापर्यंत अतिरिक्त कर्जफेड मुदतवाढ देण्यात यावी, अशी आमची मागणी आहे. 
- मोहन गोयल,
सरचिटणीस, शिव वाहतूक सेना

--------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com