esakal | दिवाळी बोनस द्या नाहीतर संपावर जातो; राज्यातील वीज कामगारांचा संतप्त इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

दिवाळी बोनस द्या नाहीतर संपावर जातो; राज्यातील वीज कामगारांचा संतप्त इशारा

महानिर्मिती, महापारेषण आणि महावितरण या तीन वीज कंपन्यांमधील कार्यरत कामगार, अभियंते, अधिकारी, सहाय्यक संघटनांनी बोनसच्या मागणीसाठी संपावर जाण्याचा इशारा दिला आहे

दिवाळी बोनस द्या नाहीतर संपावर जातो; राज्यातील वीज कामगारांचा संतप्त इशारा

sakal_logo
By
तेजस वाघमारे

मुंबई, ता. 12 : महानिर्मिती, महापारेषण आणि महावितरण या तीन वीज कंपन्यांमधील कार्यरत कामगार, अभियंते, अधिकारी, सहाय्यक संघटनांनी बोनसच्या मागणीसाठी संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. तिन्ही प्रशासनांनी बोनस व पगारवाढीचा दुसरा हप्ता देण्याचा निर्णय न घेतल्याने सर्व संघटना आज  (गुरुवार, ता.12) राज्यव्यापी निदर्शने करणार आहेत. तसेच तातडीने निर्णय जाहीर न केल्यास राज्यातील 86 हजार वीज कामगार 14 नोव्हेंबरला संपावर जातील असा इशारा संघटनांनी दिला आहे.

महत्त्वाची बातमी : 'बिहार निकालांचा आकस न ठेवता, राज्यात छटपूजेला संमती द्या'; भाजपची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

वीज कंपन्यांमधील कार्यरत कामगार, अभियंते, अधिकारी, सहाय्यक यांना दरवर्षी प्रमाणे दिवाळीपूर्वी बोनस देण्यात येतो. मात्र वीज कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना अद्यापही बोनस देण्याचा निर्णय न झाल्याने सर्व संघटनांनी एकत्रित येऊन संबंधित व्यवस्थापनाच्या प्रमुखांना बोनस आणि पगारवाढीचा दुसरा हप्ता देण्याची मागणी केली होती. मात्र कोणत्याच कंपनीने कर्मचाऱ्यांना बोनस देण्याचा निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे सर्व संघटनांची एकत्रित बैठक 10 नोव्हेंबर रोजी पार पडली.

महत्त्वाची बातमी : अर्णब गोस्वामी यांची तळोजा जेलमधून सुटका, जेलबाहेर समर्थकांचा मोठा गराडा

या बैठकीत सर्व संघटनांनी दिवाळीपूर्वी बोनसची घोषणा न केल्यास प्रथम निदर्शने करण्याचा आणि त्यानंतरही प्रशासनाने मागण्या मान्य न केल्यास 14 नोव्हेंबरपासून संपावर जाण्याचा इशारा संघटनांनी व्यवस्थापणानी दिला असल्याचे, महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचे सरचिटणीस कॉ.कृष्णा भोयर यांनी सांगितले.

( संपादन - सुमित बागुल )

give bonus or face the strike warning by power workers of the state

loading image