esakal | आयटी धोरणासाठी संकल्पना द्या : राज्यमंत्री सतेज पाटील
sakal

बोलून बातमी शोधा

satej patil

आयटी धोरणासाठी संकल्पना द्या : राज्यमंत्री सतेज पाटील

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : सरकारच्या आयटी धोरणासाठी साह्य करण्याचे आवाहन सतेज पाटील यांनी आयटी संघटनांना केले आहे. छोट्या शहरांमधून घरुनच आयटी चे काम करता यावे यासाठी अनेक आयटी केंद्रे उभारण्याची राज्य सरकारची योजना असल्याचेही त्यांनी सांगितले.

राज्यात छोट्या शहरांमध्ये आयटी उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकार कसोशीने प्रयत्न करत आहे. नॅसकॉम आणि सॉफ्टवेअर एक्सपोर्ट असोसिएशन पुणे (सीअॅप) यांनी जिल्हानिहाय डेटाबेस तयार करण्याच्या कामात सरकारला सहकार्य केले तर त्या माध्यमातून आम्हाला जिल्हानिहाय डेटा तयार करून आयटी चे सर्वोत्तम धोरण तयार करता येईल, असेही आयटी व गृहखात्याचे राज्यमंत्री सतेज पाटील यांनी म्हटले आहे.

हेही वाचा: देवेंद्र फडणवीसांवर भाजपने सोपवली नवी जबाबदारी

छोट्या शहरांमध्ये आणि गावांमध्ये सर्वोत्तम सुविधा पुरविल्यास तेथूनही कर्मचाऱ्यांना आपल्या घरातुनच आयटी क्षेत्रासाठी काम करता येईल, अशी सूचना उद्योजक आनंद देशपांडे यांनी केली होती. आयटी क्षेत्रासाठी लहान गावे विकसित करण्याच्या या संकल्पनेनुसार सरकारी माध्यमातून चालविली जाणारी नोडल केंद्र सुरु करण्याची योजना आहे. तेथून आयटीचे कर्मचारी त्यांच्या कंपन्यांसाठी काम करु शकतील, असे पाटील यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

मुंबई आणि पुण्यात आयटी कर्मचाऱ्यांचे केंद्रीकरण झाल्याने ही शहरे गर्दीची झालेली आहे. त्यामुळे नागपुर, सातारा, लातूर, नांदेड आदी शहरांमध्ये उद्योगांना सुविधा देत ती आयटी क्षेत्रासाठी सज्ज करण्याची आवश्यकता पाटील यांनी नुकतीच व्यक्त केली होती. सध्याच्या आयटी हबमधील पायाभुत सुविधा आणखी आकर्षक केल्या पाहिजेत. याबाबत सीअॅप राज्य सरकारबरोबर एकत्रित काम करण्यास उत्सुक असून प्रस्तावित आयटी धोरणाच्या अचुक अंमलबजावणीस आम्ही सहकार्य करु, असे सिअॅपचे उपाध्यक्ष विद्याधर पुरंदरे याबाबत म्हणाले.

loading image
go to top