वेतन द्या, अन्यथा फौजदारीची गुन्हे दाखल करा; महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस इंटकची मागणी

वेतन द्या, अन्यथा फौजदारीची गुन्हे दाखल करा; महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस इंटकची मागणी

मुंबई, ता. 7 : कोरोनाच्या संकट काळात सुध्दा एसटी महामंडळातील कर्मचारी रात्रंदिवस काम करीत आहेत. दिवाळी तोंडावर असूनही एसटी कर्मचाऱ्यांना ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर या तीन महिन्याचे वेतन अद्याप मिळाले नाही. त्यामुळे वेतन प्रदान अधिनियमांतर्गत फौजदारी गुन्हे महामंडळावर दाखल करा अन्यथा, कर्मचाऱ्यांचे पगार द्या अशी मागणी महाराष्ट्र एस टी वर्कर्स काँग्रेस (इंटक) संघटनेच्या वतीने राज्याचे कामगार आयुक्त डाॅ. महेंद्र कल्याणकर यांच्याकडे केली आहे.

एसटी राज्यातील गोरगरीब, सर्वसामान्याची जीवनवाहीनी आहे. सध्या एसटी महामंडळात एक लाखाहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. त्यातच तीन महिन्यापासून वेतन न मिळाल्याने कुटूंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे. लॉकडाऊन काळात कामबंद आणि पगार वेळेवर न मिळाल्याने, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी कर्मचार्यांना इतर कामाचा पर्याय निवडावा लागला आहे. त्यामुळे एसटी कर्मचारी कर्जबाजारी झाले आहे.

मुलांचे शिक्षण, आरोग्य, घरातील खर्च भागवणे सुद्धा कठीण झाले आहे. त्यामुळे आर्थिक विवंचनेतून एसटी कर्मचार्याच्या आत्महत्येची घटना सुद्धा लॉकडाऊनमध्ये घडली आहे. त्यानंतरही अद्याप कर्मचाऱ्यांना पगार मिळाले नसल्याने, संताप व्यक्त केला जात आहे. आता, आठवड्यावर दिवाळी आली असतांना, कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा निर्णय अद्याप झाला नाही. शिवाय महिन्याच्या 7 तारखेलाच वेतन होत असल्याने, ऑक्टोबर महिन्याच्या वेतन सुद्धा मिळाले नाही. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांची दसरा पाठोपाठ आता दिवाळी सुद्धा अंधारातच जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

वेतन प्रदान कायद्यातील तरतुदी

  • महिन्याच्या 7 तारखेला किंवा 7 तारखेपूर्वी वेतन देणे बंधनकारक आहे.
  • वेतन वेळेवर न दिल्यास कलम 20 अन्वये फौजदारी गुन्हयाची तरतुद 
  • एसटी कर्मचा-यांना वेळेत वेतन देण्याची कायदेशीर जबाबदारी एसटी महामंडळाची
  • कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेत अदा न केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे अधिकार कामगार आयुक्त, सहाय्यक कामगार आयुक्त व कामगार उपायुक्त 

राज्यातील शासकीय आणि इतर निमशासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेत होत आहे. त्यासोबतच बोनस सुद्धा जाहीर झाले आहे. मात्र, राज्य शासनाने कोरोनाच्या काळात राज्यातील कामगारांना वेतनापासून वंचित ठेवू नये असा निर्णय घेऊनही, अद्याप एसटी कर्मचाऱ्यांचे पगार झाले नाही. त्यामुळे कामगारांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. महामंडळाने कर्मचाऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये. असं  महाराष्ट्र एस टी वर्कर्स काँग्रेस (इंटक) सरचिटणीस मुकेश तिगोटे म्हणालेत. 

( संपादन - सुमित बागुल )

give full salaries otherwise file criminal charges ST workers aggressive

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com