पहिल्यांदाच शिवाजी पार्क मैदानात सापडतायत साप, नागरिकांमध्ये भीतीची भावना

पहिल्यांदाच शिवाजी पार्क मैदानात सापडतायत साप, नागरिकांमध्ये भीतीची भावना

मुंबई : मुंबईतील दादरमधील प्रसिद्ध शिवाजी पार्क मैदान एका धक्कादायक कारणामुळे सध्या चांगलंच चर्चेत आहे. या कारणामुळे इथे दररोज फेरफटका मारायला येणाऱ्यांचा नागरिकांमध्ये देखील भीतीचं वातावरण आहे.

गेले काही दिवस मुंबईतील दादरमधील शिवाजी पार्क मैदानातून पाच साप पकडण्यात आले आहेत. गेल्या पंधरवड्यात शिवाजी पार्क मैदान भागातून एक दोन नव्हे तर तब्बल  पाच साप पकडण्यात आलेले आहेत. काल दुपारी देखील शिवाजी पार्कवरून एका धामण जातीच्या सापाला पकडण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसात सातत्याने शिवाजी पार्क मैदानावर साप आढळून येत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. 

शिवाजी पार्क मैदानाच्या आसपास मेट्रोचं काम सुरु आहे, सोबतच इंदू मिल जागेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचं काम देखील सुरु आहे. त्यामुळे तिथल्या खोदकामांमुळे साप सुरक्षित जागी येण्याचा प्रयत्न करतायत. सोबतच लॉकडाऊनमध्ये या मैदानात खेळायला कुणीही येत नसे, त्यात पावसात मैदानातील गवत वाढल्यामुळे इथे सापांचे प्रमाण वाढलं असल्याची शक्यता वर्तवली जातेय. आतापर्यंत या मैदानातून जे साप पकडण्यात आले आहेत त्यातील एक साप विषारी तर बाकीचे चार बिनविषारी होते.  या सर्व सापांना सर्पमित्रांकडून पकडण्यात आलं.

या आधी शिवाजी पार्क मैदानात अशा साप दिसल्याच्या घटना घडल्या नव्हत्या. मात्र यंदाचं मोठ्या प्रमाणात साप आढळून आल्याने नागरिकांमधून आश्चर्य आणि चिंता व्यक्त केली जातेय. 

various snakes are observed and caught from shivaji park maidan campus

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com