esakal | एसटी कामगारांची इम्युनिटी वाढवण्यासाठी 'हे' औषध द्या..महाराष्ट्र एसटी कामगार सेनेनं केली मागणी    
sakal

बोलून बातमी शोधा

st

देशभरात कोरोना विरुद्ध लढाई सुरू आहे.  त्यासाठी अद्याप कोणतीही औषध उपलब्ध होऊ शकली नाही. अशापरीस्थितीत अनेकजण रोग प्रतिकार शक्तीच्या जोरावर कोरोनाचे बाधित रुग्ण बरे होऊन घरी परत येत आहे.

एसटी कामगारांची इम्युनिटी वाढवण्यासाठी 'हे' औषध द्या..महाराष्ट्र एसटी कामगार सेनेनं केली मागणी    

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई: देशभरात कोरोना विरुद्ध लढाई सुरू आहे.  त्यासाठी अद्याप कोणतीही औषध उपलब्ध होऊ शकली नाही. अशापरीस्थितीत अनेकजण रोग प्रतिकार शक्तीच्या जोरावर कोरोनाचे बाधित रुग्ण बरे होऊन घरी परत येत आहे.

याच आधारावर देशाच्या जनतेची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी केंद्रीय आयुष्य मंत्रालयाने दिशानिर्देश जारी केले असुन आर्सेनिक अल्बम- या होमिओपॅथी गोळ्यांचा डोस देण्याची शिफारस केली असून, ही सुविधा एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना ही मिळण्याची मागणी एसटी कामगार सेनेने केली आहे.

हेही वाचा: राज्यात कोरोनाचा हाहाकार सुरूच! आज दिवसभरात राज्यात 'इतक्या' रुग्णांची नोंद...

लाॅकडाउनमुळे अत्यावश्यक सेवेच्या वाहतुकीमध्ये प्रत्यक्ष कोविड-19 च्या रुग्णांना हाताळणा-या कोरोना वारियर्सचा प्रवासादरम्यान एसटीच्या चालक, वाहकांशी संपर्क येत आहे. राज्यात ब-याच ठीकाणी प्रवासी  मजुरांना राज्याच्या सीमेपर्यंत सोडण्यासाठी व जिल्हा अंतर्गत वाहतूक सुरू झाल्याने एसटी कामगारांना कोरोना संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर प्रत्येक पाळीमध्ये कर्मचा-यांमध्ये  सहा फुटाचे अंतर राहील अशा प्रकारे नियोजन तसेच दमा, अस्थत्मा, क्षयरोग, मधुमेह, फुफुसाचे आजार असलेले व पाच वर्षापेक्षा कमी वयाची मुले असलेले कर्मचारी तसेच दिव्यांग एसटी कर्मचा-यांना कामावर बोलवण्यात येऊ नये अशा राज्य शासनाने सूचना केल्या आहे.

त्यामुळेच 55 वर्षावरील वयाच्या कामगारांना आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी राज्य शासन, बेस्ट, व महानगरपालिका कर्मचारी यांच्या प्रमाणे सोई सवलती मिळाव्या व संपुर्ण एसटी कामगारांना आयुष्य मंत्रालयाच्या सुचनेनुसार आर्सेनिक अल्बम-30 या होमिओपॅथीक गोळ्यांचा डोस द्यावा. अशी मागणी महाराष्ट्र एसटी कामगार सेनेने उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांच्याकडे केली आहे.

हेही वाचा: अख्खी मुंबई कोरोनाच्या 'कैदेत', संशयित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ

महाराष्ट्र एसटी कामगार सेनेने उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांना निवेदन दिले आहे. होमिओपॅथी आर्सेनिक-अल्बम -३० गोळ्या कोरोना बाधित रुग्णांना न देता लहान मुलांपासुन ते वयोवृद्ध तसेच मधुमेह  उच्च रक्तदाब आणि ईतर आजार असलेल्या रुग्णांना देण्यात येते. याचा कोणताही साईडफेक्ट होत नसुन एसटी कामगारांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याची सर्व एसटी कामगारांना आल्बेनिक अल्बम-३० चा डोस देण्याची विनंती प्रशासनाकडे पत्राद्वारे केली आहे.

give homeopathy medicine for boosting immunity of ST employee read full story 

loading image