पर्यटकांना 50 हजारांपर्यंत प्राप्तिकरात सवलत द्या; हॉटेल व्यावसायिक संघटनेची सूचना 

कृष्ण जोशी
Wednesday, 20 January 2021

देशी पर्यटकांना 50 हजार रुपयांपर्यंत प्राप्तिकरात सवलत द्यावी, अशी मागणी फेडरेशन ऑफ हॉटेल ऍण्ड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडियातर्फे करण्यात आली आहे. 

मुंबई  ः सध्या डबघाईला आलेल्या पर्यटन आणि हॉटेल व्यवसायाला ऊर्जितावस्था देण्यासाठी देशी पर्यटकांना 50 हजार रुपयांपर्यंत प्राप्तिकरात सवलत द्यावी, अशी मागणी फेडरेशन ऑफ हॉटेल ऍण्ड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडियातर्फे करण्यात आली आहे. 

सध्या कोरोनाच्या फटक्‍यामुळे पर्यटन व्यवसाय जवळपास ठप्पच पडला आहे. त्यामुळे त्याला साह्य करणारी कोणतीही योजना या क्षेत्राला तसेच देशाच्या अर्थव्यवस्थेलाही चालना देईल. केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या देखो अपना देश या उपक्रमानुसार नव्या वर्षात देशांतर्गत पर्यटनाला प्रोत्साहन देणे गरजेचे आहे, असे फेडरेशनचे सहसचिव प्रदीप शेट्टी म्हणाले. 

मुंबई, ठाणे, रायगड, पालघर परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

यासाठी भारतीय पर्यटकांना 50 हजारांपर्यंत प्राप्तिकर सवलत द्यावी, त्यासाठी हॉटेलचे जीएसटी बिल ग्राह्य धरण्यात यावे, असे फेडरेशनचे उपाध्यक्ष गुरुबक्षसिंह कोहली यांनी सुचवले. पर्यटन व हॉटेल क्षेत्राचा सकल राष्ट्रीय उत्पन्नात 10 टक्के आणि रोजगारनिर्मितीतही नऊ टक्के वाटा आहे. सध्या या क्षेत्राला कोव्हिडपूर्वीच्या तुलनेत फक्त 25 टक्केच उत्पन्न मिळत आहे; तर परकीय चलनातील उत्पन्न बंदच आहे. या क्षेत्रावर 55 हजार कोटी रुपयांच्या कर्जाचा बोजा असून आमची 10 लाख कोटी रुपयांची संपत्ती निरुपयोगी अवस्थेत पडून आहे. या समस्येवर उपाय काढला नाही तर देशातील 40 ते 50 टक्के रेस्टॉरंट व 30 ते 40 टक्के हॉटेल बंद पडतील, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. 

Give income tax relief to tourists up to Rs 50,000 Notice of Hotel Professional Association

--------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Give income tax relief to tourists up to Rs 50,000 Notice of Hotel Professional Association