esakal | 'दोन डोस घेतलेल्यांना लोकलचं तिकीट द्या', गणेशोत्सवासाठी मनसेची विशेष मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

'दोन डोस घेतलेल्यांना लोकलचं तिकीट द्या', गणेशोत्सवासाठी मनसेची विशेष मागणी

'दोन डोस घेतलेल्यांना लोकलचं तिकीट द्या', गणेशोत्सवासाठी मनसेची विशेष मागणी

sakal_logo
By
रामनाथ दवणे, मुंबई

मुंबई: सध्या कोरोना प्रतिबंधक लसीचे (vaccination) दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवासाची (local journey) परवानगी आहे. पण त्यासाठी मासिक पास (monthly pass) काढणे बंधनकारक आहे. लोकल प्रवासाचा मासिक पास काढणाऱ्यांना प्रवासाची परवानगी आहे. दोन डोस घेतल्याचे प्रमाणपत्र दाखवल्यानंतरच लोकलचा मासिक पास दिला जातो. सध्या गणेशोत्सवाच्या काळात रेल्वे तिकिटावर (Railway ticket) प्रवासाची परवानगी द्यावी, अशी मनसेची मागणी आहे.

गणेशोत्सव काळात दोन डोस घेतलेल्या नागरिकांना मासिक पाससोबत रेल्वे तिकीटही द्या, अशी मनसेने मागणी केलीय. प्रत्येकाला रेल्वेचा मासिक पास काढणं शक्य नाही. गणेशोत्सवाच्या दरम्यान लोक एकमेकांच्या घरी जातात. त्यामुळे आमची रेल्वे प्रशासनाला आणि राज्य प्रशासनाला विनंती आहे की, "या गणेशोत्सवाच्या काळामध्ये दोन डोस घेतलेल्या प्रवाशांना रेल्वेचं तिकीट सुद्धा द्या."

हेही वाचा: महाराष्ट्र सदन प्रकरण : दोषमुक्त झाल्यावर भुजबळांची प्रतिक्रिया

प्रत्येक व्यक्ती संपूर्ण मासिक पास घेऊ शकत नाही त्यामुळे आम्ही राज्य सरकारचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना सुद्धा पत्राद्वारे हीच मागणी केलेली आहे. संदीप देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या शिष्टमंडळाने आज यासाठी रेल्वे अधिकाऱ्यांची भेट घेतली. मनसे सुरुवातीपासून सर्वसामान्यांच्या लोकल प्रवासासाठी आग्रही राहिली आहे.

loading image
go to top