esakal | Mumbai Train : दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांसाठी जनहित याचिका
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai Local Train

Mumbai Train : दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांसाठी जनहित याचिका

sakal_logo
By
सुनिता महामुनकर

मुंबई : ज्या नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस (Corona Vaccination) घेतले असतील त्या नागरिकांना रेल्वे आणि मेट्रोमधून (Train traveling) प्रवास करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी करणारी जनहित याचिका (Petition) मुंबई उच्च न्यायालयात (High Court) करण्यात आली आहे. विलेपार्लेमधील चार्टर्ड अकाउटंट आणि रहिवासी मोहन भिडे यांनी एड निलजा किर्पेकर आणि एड शेखर भगत यांच्यामार्फत याचिका दाखल केली आहे. ज्या नागरिकांनी कोव्हिशिल्ड किंवा कोव्हॅक्सीन दोन्ही डोस घेतले आहेत आणि ज्यांना केंद्र सरकारच्या (Central Government) कोविनमध्ये प्रमाणपत्र (Covin Certificate) मिळालेले आहे त्यांना रेल्वे प्रवासापासून वंचित ठेऊ नये, किमान या नागरिकांना तरी सर्वसामान्य जीवन जगण्याची परवानगी द्यावी असे याचिकेत म्हटले आहे. ( Give Permission to those who have taken two vaccine Dose Petition in Court- nss91)

हेही वाचा: 26/11 मधील हिरो संजय गोविलकर विभागीय चौकशीत निर्दोष

कोविड 19 आणि लौकडाऊनमुळे बहुतांश लोकांच्या नोकर्या आणि कामधंदा बंद झाला आहे. परराज्यातील नागरिकांना महाराष्ट्रात येण्यासाठी दोन डोस घेतल्याचे प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे. तसेच त्यांना आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक आहे. राज्य मध्ये सुमारे तीस टक्के नागरिकांनी एक डोस घेतला आहे. त्यामुळे ज्यांना दोन डोस मिळाले आहेत त्यांना प्रवास करणे सुरक्षित होईल, असा दावा करण्यात आला आहे. तसेच यामुळे राज्याची अर्थव्यवस्था सुरळीत होण्यासाठी मदत होऊ शकेल, असेही याचिकेत म्हटले आहे. याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना रेल्वेमधून प्रवास करण्याची मुभा दिली आहे. अन्य नोकरदार कर्मचाऱ्यांना यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मात्र तिसर्या संभाव्य लाटेमुळे राज्य सरकारने निर्बंध जारी केले असून सर्वसामान्य नागरिकांना रेल्वेप्रवासाला स्पष्ट मनाई केली आहे.

loading image