esakal | 26/11 मधील हिरो संजय गोविलकर विभागीय चौकशीत निर्दोष
sakal

बोलून बातमी शोधा

26/11 terrorist Attack

26/11 मधील हिरो संजय गोविलकर विभागीय चौकशीत निर्दोष

sakal_logo
By
अनिष पाटील

मुंबई : मुंबईवर 26/11 ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात (Terrorist Attack) कसाबला पकडण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गोविलकर(Sanjay Govilkar) विभागीय चौकशीत निर्दोष सापडले आहे. 2019 मध्ये गुन्ह्यात सहभाग असलेल्या आरोपीला सोडण्याच्या आपोराखाली(Allegations) तत्कालीन पोलिस आयुक्त संजय बर्वे (Sanjay Barve) यांनी विभागीय चौकशीचे आदेश दिले होते. ( Police Sanjay Govilkar innocent in Mumbai terrorist Attack - nss91)

मुंबईचे सहपोलिस आयुक्त(कायदा व सुव्यवस्था) विश्वास नांगरे पाटील यांनी नुकतीचे याबाबतचे आदेश जारी केले असून त्यात विभागीय चौकशीत गोविलकर यांच्याविरोधात कोणतेही पुरावे न सापडल्यामुळे त्यांच्याविरोधातील विभागीय चौकशी बंद करण्यात आल्याचे नमुद करण्यात आले आहे. तसेच त्यांचा निलंबनाचा कार्यकाळही कर्तव्यकाळ म्हणून गणण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. निलंबन सरकारी कर्मचा-याला निलंबन कालावधीत अर्धा पगार मिळतो. गोविलकर यांच्याविरोधातील निलंबना यापूर्वीच मागे घेण्यात आले होते. सध्या ते मध्य प्रादेशिक परिमंडळाच्या सायबर पोलिस ठाण्यात वरिष्ठ पोलिस निरीक्षक पदावर कार्यरत आहेत.त्यांच्यासह याप्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक जितेश शिंगोटे यांच्याविरोधातील विभागीय चौकशीही बंद करण्यात आली आहे.

हेही वाचा: राज्य सरकार आणि देशमुखांना हायकोर्टाचा दणका

आर्थिक गुन्ह्यांतील आरोपी सोहैल भामला याला मुंबई विमानतळावरून जाऊ दिल्याच्या आरोपाखाली दोन पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. गोविलकर त्या कक्षाचे प्रमुख असल्यामुळे त्यांच्यावरही गोविलकर यांचे निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. 2004 मध्ये भामलाला मुंबईत बनावट नोटांप्रकरणी पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. अंतरिम जामीन मिळाल्यानंतर तो बेपत्ता झाल्याने त्याला फरार घोषित करण्यात आले होते. जुहू येथील एका व्यापा-यानेही भामलाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. मुंबई पोलिसांनी भामलासाठी लुक आऊट नोटीसही काढली होती. मुंबईत दाखल होताच विमानतळ प्राधिकरणाने भामलाला ताब्यात घेतले आणि आर्थिक गुन्हे शाखेला कळविले. गोविलकर या शाखेचे युनिट 3 चे पोलीस निरीक्षक होते. चौकशीनंतर सोडण्यात आले होते. पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी या घटनेची गंभीर दखल घेत गोविलकर व शिंगोटे यांच्यावर निलंबनाची कारवाई करून चौकशीचे आदेश दिले होते.

26 नोव्हेंबर 2008 साली मुंबईवर जेव्हा दहशतवाद्यांनी हल्ला केला होता, तेव्हा गिरगाव चौपाटीजवळ पोलीस हवालदार तुकाराम ओंबळे आणि गोविलकर या दोघांनी कसाबला जिवंत पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले होते. कसाबने केलेल्या हल्ल्यात ओंबळे शहीद झाले होते. गोविलकर आणि दुसऱ्या एका पोलीस अधिकाऱ्याने इस्माईल खान याला यमसदनी पाठवले होते. गोविलकर यांच्या कामगिरीबद्दल त्यांना राष्ट्रपती पोलीस पदकानेही सन्मानित करण्यात आले होते.

loading image