esakal | ''...मग आम्हाला उन्हाळी सुट्टी द्या'', शिक्षकांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

बोलून बातमी शोधा

cm uddhav thackeray
''...मग आम्हाला उन्हाळी सुट्टी द्या'', शिक्षकांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
sakal_logo
By
संजीव भागवत

मुंबई: पहिली ते अकरावीपर्यंतच्या सर्व वर्गाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या असून त्यामुळे ऑनलाईन शिक्षणही आता बंद झालेले आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे मिळणारी उन्हाळी सुट्टी शाळांना जाहीर करावी अशी मागणी शिक्षण आणि मुख्याध्यापक संघटनांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

पहिली ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण केले जाणार आहे, तर दहावी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना केवळ अंतर्गत मूल्यमापनाद्वारे त्यांना उत्तीर्ण केले जाणार आहे. त्यामुळे ऑनलाईन शिक्षणही तूर्तास थांबले असल्याने यादरम्यान शिक्षकांना उन्हाळी सुट्टया जाहीर करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटना, शिक्षक परिषदेसह मुख्याध्यापक संघटनांनी केली आहे.

हेही वाचा: रुग्णवाढ स्थिरावली; मात्र राज्यात मृत्यूचं थैमान सुरुच

शैक्षणिक वर्षांच्या ठरलेल्या नियोजनाप्रमाणे दरवर्षी मार्च अखेरपर्यंत अध्ययन समाप्ती होऊन एप्रिलमध्ये वार्षिक परीक्षा घेण्यात येतात. त्यानंतर उन्हाळी सुट्टीला सुरूवात होते. पण यंदा कोरोनामुळे गणपती आणि दिवाळातही विद्यार्थी, शिक्षकांना ऑनलाईन अभ्यासातून सुट्टी घेता आली नाही. त्यामुळे आता ही सुट्टी जाहीर करण्याची मागणी करण्यात आली आहे.

----------------------------

(संपादन- पूजा विचारे)

give us summer vacation teachers demanded to cm uddhav thackeray