esakal | भीती कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची, महापौर म्हणतात "वाढती कोरोना रुग्णसंख्या पाहता लोकल सुरु करणाची घाई नको"
sakal

बोलून बातमी शोधा

भीती कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची, महापौर म्हणतात "वाढती कोरोना रुग्णसंख्या पाहता लोकल सुरु करणाची घाई नको"

दिवाळी नंतर मुंबईची लोकल सामान्य प्रवाशांसाठी सुरु होणार अशी चर्चा होती. मात्र, महापौर किशोरी पेडणेकर यांनी लोकल सुरु करण्याची घाई नको अशी परखड भुमिका मांडली आहे.

भीती कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची, महापौर म्हणतात "वाढती कोरोना रुग्णसंख्या पाहता लोकल सुरु करणाची घाई नको"

sakal_logo
By
समीर सुर्वे

मुंबई, ता.20 : दिवाळी नंतर मुंबईची लोकल सामान्य प्रवाशांसाठी सुरु होणार अशी चर्चा होती. मात्र, महापौर किशोरी पेडणेकर यांनी लोकल सुरु करण्याची घाई नको अशी परखड भुमिका मांडली आहे.

दिल्लीत कोविडची दुसरी लाट सुरु आहे. तर, अहमदाबादमध्ये रुग्ण वाढू लागल्यामुळे कर्फ्यू लावण्यात आला आहे. मुंबईत कोविड आता नियंत्रणात आहे. त्यामुळे लोकलसुरु करण्याची मागणी आता नोकरदारांकडून होऊ लागली आहे. मात्र, महापौरांनी लोकल सुरु करणाची घाई करु नका अशी भुमिका मांडली आहे.

महत्त्वाची बातमी : ३१ डिसेंबरपर्यंत महापालिका, सरकारी आणि सर्व खासगी शाळा बंदच राहणार, इकबाल सिंह चहल यांचा निर्णय

दिवाळी झाली आहे त्याचबरोबर थंडीत कोविड पसरणाचा अधिक धोका आहे. मुंबईची परीस्थीती सध्या नियंत्रणात  आहे. मात्र,अद्याप कोविड संपलेला नाही. लोकलमध्ये होणाऱ्या गर्दीचा विचार करता लोकल सुरु करणे योग्य नाही असेही महापौरांनी नमुद केले.

महत्त्वाची बातमी : पवारसाहेब, "मराठा स्त्रीला महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री करायची भूमिका तुम्ही घेतली तर त्याला समर्थन"

मास्क वापरा वैयक्तिक स्वच्छता बाळगा 

कोविड नियंत्रणात आहे. मात्र, पुर्णपणे संपलेला नाही. त्यामुळे खबरदारी बाळगणे गरजेचे आहे. असे महापौरांनी सांगितले.काही नागरीक आजही मास्क न लावता फिरत आहेत. सर्वांनी मास्क वापरलेच पाहिजे. तसेच वैयक्तीक स्वच्छता राखून सुरक्षित अंतर राखायला हवे असेही महापौरांनी सांगितले.

( संपादन - सुमित बागुल )

Given the growing number of corona patients dont rush to start a local kishori pednekar