माळशेज घाटात काचेचा स्काय वॉक बांधणार

निसर्ग सौंदर्याने नटलेल्या माळशेज घाटात हिमधवल धबधबे व हिरवाईची मजा लुटण्यासाठी पावसाळ्यात पर्यटकांची मोठी गर्दी होत असते.
माळशेज घाट
माळशेज घाटEsakal

मुरबाड : माळशेज घाटात काचेचा स्काय वॉक व गार्डन बांधण्यासाठी डी पी आर तयार करण्याचा आदेश केंद्रीय रस्ते व वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्याची माहिती मुरबाड चे आमदार किसन कथोरे यांनी दिली स्काय वॉक व माळशेज घाटात नवीन बोगदा करणे साठी 2478 कोटी रुपयांची तरतूद करण्याचा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. (Mumbai News)

निसर्ग सौंदर्याने नटलेल्या माळशेज घाटात हिमधवल धबधबे व हिरवाईची मजा लुटण्यासाठी पावसाळ्यात पर्यटकांची मोठी गर्दी होत असते येथे काचेचा स्काय वॉक झाल्यास बारा महिने पर्यटकांची गर्दी होईल याचा फायदा ठाणे व पुणे जिल्ह्याच्या पर्यटन वाढीसाठी होणार आहे.

माळशेज घाट परिसरात येणाऱ्या पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी शासनाने घाटात ठिकठिकाणी सहलीसाठी व निसर्गरम्य दृश्ये असणारी विश्रांती स्थाने तयार केली आहेत त्यांच्या जोडीला काचेचा बोगदा तयार झाल्यास ठाणे व पुणे या दोन्ही जिल्ह्याच्या पर्यटन वाढीसाठी फायदा होणार आहे.

माळशेज घाट
'देशात पॉर्न पाहण्याचं कारणं सनी लिओनी, तिच्यावर कारवाई का नाही?'

केंद्रीय रस्ते व वाहतुक मंत्री गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दिल्लीतील कार्यालयात ठाणे जिल्ह्यातील रस्त्यांच्या संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती, या बैठकीतखलील कल्याण जवळील शहाड रस्त्यावर असलेला ओवरब्रिज मोठा करण्यासाठी तत्वतः मान्यता देण्यात आली , वरप-कांबा ते माळशेज घाट हा रस्ता चौपदरी करण्यासाठी जमीन अधिग्रहण करण्यासाठी आदेश देण्यात आले.शीळफाटा-बदलापूर-म्हसा-माळशेज घाट , या रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देणे यासंबंधी चर्चा झाली. बैठकीसाठी भिवंडी लोकसभा मतदार संघाचे खासदार व केंद्रीय पंचायत राज मंत्री कपिल पाटील , खासदार गोपाळ शेट्टी , मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे उपस्थित होते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com