'देशात पॉर्न पाहण्याचं कारणं सनी लिओनी, तिच्यावर कारवाई का नाही?'

बॉलीवूडमध्ये (bollywood) काहीही झालं तरी त्यावर प्रतिक्रिया देणं ही त्या कलाकाराची ओळख आहे.
krk and sunny Leoni
krk and sunny Leoni team esakal

मुंबई - बॉलीवूडमध्ये (bollywood) काहीही झालं तरी त्यावर प्रतिक्रिया देणं ही त्या कलाकाराची ओळख आहे. त्याचं नाव कमाल राशिद खान.(krk) हा अभिनेता त्याच्या वेगवेगळ्या प्रतिक्रियेसाठी चर्चेत असतो. सोशल मीडियावरही त्याला मोठ्या प्रमाणात फॅन फॉलोअर्स आहे. आता तो पुन्हा चर्चेत आला ते अभिनेत्री सनी लिओनीवर (sunny leoni) केलेल्या वक्तव्यामुळे. काही दिवसांपासून अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा वादाचा मुद्दा ठरला आहे. तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. मात्र पोलिसांनी केलेल्या तपासात त्याच्याशी संबंधित अनेक कलाकारांची नावंही समोर आली आहे. पॉर्नोग्राफी (pornography) प्रकरण आणि त्याच्याशी संबंधित कलाकारांवर सोशल मीडियातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येताना दिसत आहे.

कमाल खाननं आता सनी लिओनीवर टीका केली आहे. सध्या बॉलीवूडमध्ये सनी लिओनी स्टार अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध आहे. मात्र यापूर्वी तिनं ज्या चित्रपटांमध्ये काम केलं होतं ते चित्रपट कशाप्रकारचे होते त्यावर केआरकेनं टीका केली आहे. त्यात असं म्हटलं आहे की, सनीनं ज्या चित्रपटांमध्ये काम केलं त्या चित्रपटांवर बंदी का नाही आणण्यात आली, तिच्यावरही कारवाई का केली नाही, असा प्रश्न कमाल खाननं उपस्थित केला आहे. त्याच्या या प्रश्नावर चाहत्यांनी वेगवेगळे प्रश्नही विचारले आहेत.

काही महिन्यांपूर्वी केआरके आणि सलमान खान यांच्यात मोठा वाद झाला होता. सलमानच्या राधे या चित्रपटावरुन हा वाद झाला होता. कमाल खाननं त्या चित्रपटाचा रिव्ह्यु करुन सलमानशी पंगा घेतला होता. त्यांचा तो वाद न्यायालयापर्यत गेला. आणि सलमाननं कमाल खानविरोधात मानहानीचा दावाही ठोकला होता. कंगनाशीही कमाल खाननं वादावादी केली होती. त्या दोघांमधील वाद हा त्या दोघांच्याही चाहत्यांसाठी मनोरंनाचा विषय होता.

केआरकेनं सनीविषयी सांगितलं आहे की, भारतात पॉर्न वाढण्यामागे सनी कारणीभूत आहे. असं असताना तिच्यावर कारवाई का नाही करण्यात आली, सध्याच्या घडीला भारतामध्ये वेगवेगळे पॉर्न स्टार आहेत. त्याचे कारणही सनी लिओनी ही आहे. याचा परिणाम असा की, इतर मुली देखील त्या क्षेत्राकडे जात असल्याचा आरोप कमाल खाननं केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com