
डोंबिवली : डोंबिवलीत गोव्याचे राज्यपाल डॉ. पी.एस. श्रीधरन पिल्लई हे केरळ समाजम् मॉडेल कॉलेजच्या इमारतीच्या तिसऱ्या टप्प्याच्या उद्घाटन आणि उत्सव समारंभास आले होते. या मल्याळम कार्यक्रमात त्यांनी संपूर्ण संवाद मल्याळम मध्ये साधला. राज्यपालांच्या भाषणाचा हा व्हिडीओ समाज माध्यमातून व्हायरल झाला आहे. गोव्याचे राज्यपाल डॉ. पी.एस. श्रीधरन पिल्लई यांनी मल्याळम भाषेत भाषण केल्यानंतर मनसे नेते राजू पाटील यांनी केली एक्स पोस्ट केली आहे. या एक्स पोस्टची चर्चा सध्या होत आहे.