esakal | शाळेत असलेल्या कैद्यांमुळे विद्यार्थी माघारी; विलगीकरण कक्ष सुरूच | prisoners
sakal

बोलून बातमी शोधा

prisoners

शाळेत असलेल्या कैद्यांमुळे विद्यार्थी माघारी; विलगीकरण कक्ष सुरूच

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

खारघर : शाळा सुरू होणार असल्यामुळे खारघर वसाहतीमधील (Kharghar society) गोखले शाळेत (Gokhale school) काही मुले दप्तर घेउन दाखल झाली. मात्र शाळेत कैदी असल्यामुळे (prisoners) त्‍यांना माघारी जावे लागले. तळोजा कारागृहात (taloja jail) नव्याने येणाऱ्या कैद्यांसाठी गोखले शाळेत विलगीकरण केंद्र (Isolation) सुरू करण्यात आले आहे. या शाळेत पहिली ते दहावीपर्यंतचे जवळपास आठशेहून अधिक मुले आहे. सोमवारी शाळा सुरू होणार असल्यामुळे आठवी ते दहावीतील काही विद्यार्थी गणवेश परिधान करून आणि दप्तर घेवुन शाळेत दाखल झाले.

हेही वाचा: वसई-विरार शहरात गळती काही थांबेना; हजारो लिटर पाणी वाया

मात्र शाळेत तळोजा कारागृहातील कैदी विलगीकरणासाठी ठेवण्यात आल्यामुळे त्‍यांना माघारी जावे लागले. शिक्षण विभागाने आठ दिवसापूर्वी चार तारखेपासून शाळा सुरू होणार असल्याचे सांगितले होते. त्यापूर्वी कारागृह प्रशासनाने कैद्यांसाठी इतर ठिकाणी सोय उपलब्ध करणे आवश्यक होते. मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे शाळा प्रशासन आणि पालक वर्गाने नाराजी व्यक्त केली. या विषयी शाळेत विचारणा केली असता, पोलिस अधिक्षकांना पत्र लिहून शाळा खाली करण्याबाबत पत्र दिले आहे. कैद्यांचे स्‍थलांतर केल्‍यावर शाळेची स्वच्छता, सॅनिटायजेशन करून शाळा सुरू करण्यात येईल, असे सांगितले.

"पनवेल महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांच्याशी संपर्क साधून तळोजा कारागृहातील कैद्यांची इतर ठिकाणी व्यवस्था करावी, असे पत्र पाठविले जाईल. त्‍यानंतर लवकरच गोखले शाळा सुरू होईल."
- महेंद्र कल्याणकर, जिल्हाधिकारी, रायगड

"जिल्‍हाधिकारी कार्यालयाकडून गोखले शाळा खाली करण्यासंदर्भात कारागृह प्रशासनास पत्र दिले आहेत का, या विषयी चौकशी केली जाईल."
- विजय तळेकर, तहसीलदार, पनवेल

हेही वाचा: नवी मुंबई : ऑक्टोबर हिटचा तडाखा; बदलत्‍या हवामानाचा परिणाम

"शासनाने शाळा सुरू केले आहे. मात्र बहुतांश पालक आणि विद्यार्थी गावी असल्यामुळे केवळ २५ टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती आहे. कोरोना वाढला आणि शाळा पुन्हा बंद होतील, अशी भीती पालकांना वाटत असावी."
- डॉ जी. के. डोंगरगावकर, अध्यक्ष, सिद्धार्थ विद्यालय, खारघर

खारघरमध्ये गोखले शाळा, सुधागड हायस्कूल, ज्ञानज्‍योत, केपीसी, सेंटमेरी, सत्याग्रह व इतर काही खासगी शाळा आहेत. बहुतांश विद्यार्थी सर्वसामान्य कुटुंबातील आहेत. काही पालकांचे नोकरी-व्यवसाय बंद झाल्यामुळे ते कुटुंबासह गावी गेले आहेत. त्‍यामुळे शाळांमध्ये विद्यार्‍थ्‍यांची उपस्‍थिती कमी असल्‍याचे एका शाळेच्या मुख्याध्यापिकेने सांगितले.

loading image
go to top