esakal | नवी मुंबई : ऑक्टोबर हिटचा तडाखा; बदलत्‍या हवामानाचा परिणाम | Navi mumbai
sakal

बोलून बातमी शोधा

climate-change

नवी मुंबई : ऑक्टोबर हिटचा तडाखा; बदलत्‍या हवामानाचा परिणाम

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

तुर्भे : दोन दिवसांपासून तापमानामध्ये वाढ झाल्‍याने (Temperature increases) उन्हाचे चटके, उकाड्‌याने नागरिक हैराण झाले आहेत. नवी मुंबई शहरात (navi mumbai) ढगाळ वातावरण आणि उन्हाचा खेळ (summer) सुरू झाला आहे. दरम्यान, पुढील दोन दिवस शहरात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता (rainfall) वर्तविण्यात आली आहे. सकाळपासूनच उन्हाचे चटके बसत असल्याने नवी मुंबईकरांना ‘ऑक्टोबर हिट’चा तडाखा जाणवू लागला आहे.

हेही वाचा: एनसीबीच्या परवानगीने लॉकअपमध्ये बाप-लेकाची झाली भेट

सोमवारी कमाल ३३ अंश सेल्सिअस आणि किमान २१.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. गेल्या आठवड्यात पावसाने दमदार हजेरी लावली होती. राज्‍यातील काही भागांत ओला दुष्‍काळ जाहीर करण्याची वेळ आली होती. मात्र दोन दिवसात आकाश निरभ्र झाले असून उन्हाचे चटके बसत आहेत. नागरिक उन्हापासून वाचण्यासाठी टोप्या, छत्र्या, गॉगल घेऊन बाहेर पडू लागले आहेत. बदलत्‍या हवामानामुळे साथीचे आजार बळावले असून डेंगी, मलेरियासह सर्दी खोकल्‍याच्या रुग्‍णांतही वाढ झाली आहे.

हेही वाचा: मुंबई: वर्तमानपत्राचे महत्त्व सांगणाऱ्या वह्यांची विद्यार्थ्यांना भेट

सध्या दुहेरी वातावरण अनुभवयास मिळत आहे. सकाळी नऊनंतर उकाडा तर संध्याकाळी बोचरी थंडी जाणवते. शहरातील बहुतेक क्‍लिनिकमध्ये गर्दी वाढली आहे. कणकण वाटणे, सर्दी-खोकला, घसा दुखणे, हलका ताप, अंगदुखीचे आदी व्याधी बळावल्‍या आहेत. तापमान वाढल्‍याने शीतपेय, उसाचा रस, फळांचा रस, लिंबू पाणी पिण्याला अनेकांकडून पसंती दिली जात आहे.

"उन्हाची दाहकता वाढली आहे. बदलत्‍या हवामानामुळे कधी उकाडा तर कधी थंडी अशा दुहेरी वातावरणाचा अनुभव नवी मुंबईकर घेत आहेत. अशा वातावरणामुळे ताप, अंगदुखी, डोकेदुखी जाणवत आहे."
- विराज झरेकर, नागरिक

loading image
go to top