
कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र भीतीचे आणि असुरक्षिततेचे वातावरण नागरिकांमध्ये पसरले असताना 106 वर्षाच्या वयोवृद्ध महिलेस कोरोनामुक्त होऊन डिस्चार्ज मिळणे ही अत्यंत सकारात्मक आणि समाधान कारक बाब आहे.
मुंबई, ता.20 : मुंबईसह राज्यात कोरोनाची दहशत कायम असतांना एका 106 वर्षांच्या आजीने कोरोनावर यशस्वी मात केली. कोरोनातून बरे झाल्यावर आपल्या घरी परतल्यानंतर या अजीबाईंनी चक्क बल्ले बल्ले करत आपला आनंद व्यक्त केला.
डोंबिवलीतील आनंदीबाई पाटील या 106 वर्षीच्या वयोवृद्ध आजीला कोरोनाची बाधा झाली. मात्र त्यांच्या वयामुळे अनेक रुग्णालयांनी त्यांना दाखल करून घेण्यास नकार दिला. परंतु डोंबिवली येथील सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलातील, कोविड समर्पित रुग्णालयातील डॉ. राहुल घुले यांनी त्यांना तिथे दाखल करून त्यांच्यावर उपचार सुरू केले. आज त्या उपचाराअंती कोरोनामुक्त झाल्या आहेत.
महत्त्वाची बातमी - अनुराग कश्यप यांनी सरळ सरळ बाळासाहेब ठाकरे यांची बदनामी केलीये - निलेश राणे
आजींचे वय जास्त असल्याने त्यांची विशेष काळजी घेण्यात आली. त्यांच्या शरीरातील ऑक्सिजन, मधुमेह तसेच रक्तदाब तपासून यावर लक्ष ठेवण्यात आले. मात्र यातून बरे झाल्यानंतर आजींना आज सावळाराम महाराज म्हात्रे कोविड समर्पित रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. कोविड-19 चा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी अथकपणे काम करणारे महापालिका प्रशासन, डॉ. राहुल घुले यांच्यावर आता सर्वच स्तरातुन अभिनंदन आणि कौतुकाचा वर्षाव होतोय.
कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र भीतीचे आणि असुरक्षिततेचे वातावरण नागरिकांमध्ये पसरले असताना 106 वर्षाच्या वयोवृद्ध महिलेस कोरोनामुक्त होऊन डिस्चार्ज मिळणे ही अत्यंत सकारात्मक आणि समाधान कारक बाब आहे.
Well done @1rupeeclinic @KDMCOfficial and MP @DrSEShinde !
The blessings of Mrs. Anandibai Patil ji and many more like her keep us all going strong! https://t.co/I22ZEsnOJK— Aaditya Thackeray (@AUThackeray) September 20, 2020
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील ट्विट करून महापालिका प्रशासन व डॉ.राहुल घुले यांचे कौतुक केले आहे.
good news 106 years old lady from dombivali recovered from corona